बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा यांचं निधन, 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Jan 20, 2022 | 5:35 PM

मुंबई: बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा (arun varma) यांचं निधन झालंय. ते 62 वर्षांचे होते. काल ( बुधवार) मध्यरात्री 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यांच्यावर भोपाळमधल्या पिपल्स हॉस्पिटलमध्ये (peoples hospital) उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अरुण वर्मा यांचे […]

बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा यांचं निधन, 62 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अरुण वर्मा
Follow us on

मुंबई: बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा (arun varma) यांचं निधन झालंय. ते 62 वर्षांचे होते. काल ( बुधवार) मध्यरात्री 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यांच्यावर भोपाळमधल्या पिपल्स हॉस्पिटलमध्ये (peoples hospital) उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अरुण वर्मा यांचे सिनेमे

अरुण वर्मा यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केलं आहे. ‘डकैत’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. खलनायक, नायक, प्रेम ग्रंथ. हिना, मुझसे शादी करोगी, हिरोपंती, या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. नुकतंच त्यांनी कंगना रनौतची निर्मिती असलेल्या टिकू वेड्स शेरू या चित्रपटात काम केलं.

अरुण वर्मा यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली. मात्र त्याचं फुफ्फुस निकामी झालं. हळूहळू त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं कमी केलं आणि अखेर आज त्यांचं निधन झालं. CINTAA या संस्थेने अरुण वर्मा यांच्या उपचारासाठी 50 हजारांची मदत केल्याची माहिती आहे. अशा अनेक समाजसेवी संस्थांनी त्यांच्या उपचारासाठी मदत केली आहे.

अभिनेता आणि कॉमेडियन उदय दहिया यांनी अरुण वर्मा यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. ‘मला हे सांगताना अत्यंत दुःख होतंय की माझे मित्र अरुण वर्मा यांचं भोपाळमध्ये निधन झालं. ओम शांती’, अशी पोस्ट उदय दहिया यांनी केली आहे. अरुण वर्मा यांनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि सलमान खान यांसारख्या बड्या स्टार्ससोबतही काम केले आहे. त्यांनी 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या

उत्तरप्रदेशच्या राजकारणात कंगनाची एन्ट्री, एक फोटो शेअर आणि सोशल मीडियावर चर्चाच चर्चा!

लतादिदींच्या प्रकृतीत सुधारणा नाही, डॉक्टर म्हणाले, ‘किती दिवसात बऱ्या होतील सांगणं कठिण’

किरण मानेंना मिळाला नवा चित्रपट; चित्रीकरण सुरू ?