Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aashram 4 : कधी प्रदर्शित होणार ‘आश्रम 4’? बॉबी देओल याचा व्हिडीओ पाहून म्हणाल…

Aashram 4 : 'बाबा अंतरयामी आहे, त्याला तुमच्या मनातील...' 'आश्रम 4' सीरिजची उत्सुकता शिगेला, 'तो' व्हिडीओ पोस्ट करत बॉबी देओल म्हणाला..., 'आश्रम 4' सीरिज कधी होणार प्रदर्शित?

Aashram 4 : कधी प्रदर्शित होणार 'आश्रम 4'? बॉबी देओल याचा व्हिडीओ पाहून म्हणाल...
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 12:03 PM

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : अभिनेता बॉबी देओल स्टारर ‘आश्रम’ सीरिजला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. ‘आश्रम’ सीरिजचे तीन सीझन यशस्वी ठरल्यानंतर ‘आश्रम 4’ सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सीरिजमध्ये बाबा निराला भूमिकेला न्याय देत बॉबी देओल याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता पुन्हा बॉबी ‘आश्रम 4’ सीरिजच्या माध्यमातून लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सीरिजच्या तिसऱ्या सिझननंतर चाहते चौथ्या सीझनच्या प्रतीक्षेत होते.

रिपोर्ट्सनुसार, ‘आश्रम 4’ या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. याचा अर्थ लवकरच बॉबीच्या चाहत्यांना बाबा निरालाच्या कारनाम्यांचे रहस्य उलगडताना पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘आश्रम 4’ सीरिजची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Bobby Deol (@iambobbydeol)

‘आश्रम 4’ सीरिजची चर्चा रंगलेली असताना बॉबी देओल याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये, ‘बाबा अंतर्यामी आहे. त्याला तुमच्या मनातील गोष्टी कळतात… म्हणून #Aashram3 च्या एपिसोडसोबत #Aashram4 ची एक झलक समोर आणली आहे.’ असं लिहित #Aashram4 #TeaserOutNow हॅशटॅग देखील दिले आहेत.

दिग्दर्शक प्रकाश झा यांची लोकप्रिय सीरिज ‘आश्रम 1’ 28 ऑगस्ट 2020 रोजी कोरोना काळात प्रदर्शित झाली. पहिल्या सीझनमध्ये एकूण 9 भाग होते. यानंतर लगेचच त्याच वर्षी ‘आश्रम 2’ प्रदर्शित झाला. दुसऱ्या सीझनमध्येही एकूण 9 एपिसोड होते आणि या सीझनने लोकांना खूप आश्चर्यचकित केलं. तर ‘आश्रम सीरिज 3’ मोठ्या अंतरानंतर रिलीज झाली, 3 जून 2022 रोजी रिलीज झाली. आता ‘आश्रम 4’ च्या प्रतीक्षेत चाहते आहेत.

‘आश्रम 4’ सीरिज याच वर्षी प्रदर्शित होईल असं देखील सांगण्यात येत आहे. पण ‘आश्रम 4’ सीरिजच्या रिलिज डेटबद्दल निर्मात्यांकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. एवढंच नाही तर, कोणी अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला
कोणी महत्वाचं व्यक्ती असतं तर..; रोहित पवारांचा गोपीचंद पडळकरांना टोला.
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं
'...त्यांना मन की बात सांगावी', राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं.
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा
'कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण...', आरोपींचा खुलासा.
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार
'त्यांचंही दूध काढू', पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा पटलवार.