Bobby Deol : कसं आहे बॉबी – सनी देओल यांचं नातं? धर्मेंद्र यांच्या मुलांबद्दल मोठं सत्य अखेर समोर

Bobby Deol | बॉबी - सनी देओल यांच्यातील नातं जगासमोर; धर्मेंद्र यांचं कुटुंबसध्या तुफान चर्चेत कारण? सनी देओल आणि बॉबी देओल यांच्यामध्ये आहे १० वर्षांचं अंतर... बॉबी देओल याच्या वक्तव्यानंतर मोठं सत्य समोर.. अभिनेता असं काय म्हणाला, ज्यामुळे डोळ्यात आलं पाणी...

Bobby Deol : कसं आहे बॉबी - सनी देओल यांचं नातं? धर्मेंद्र यांच्या मुलांबद्दल मोठं सत्य अखेर समोर
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 12:20 PM

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : अभिनेते धर्मेंद्र यांची दोन मुलं आणि अभिनेते सनी देओल आणि बॉबी देओल यांनी देखील बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. देओल कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. दरम्यान बॉबी देओल याने मोठा भाऊ सनी देओल यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, ‘सनी फक्त माझा मोठा भाऊ नाही तर, तो माझ्यासाठी वडिलांप्रमाणे आहे. सनी माझ्यापेक्षा १० वर्ष मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी तो मला सल्ले देत असायचा… मला बोलण्यासाठी त्याने एकही संधी सोडली नाही..’ सध्या सर्वत्र सनी – बॉबी यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

बॉबी देओल पुढे म्हणाला, ‘शालेय दिवसांमध्ये सनी देखील अभ्यासात फार हुशार नव्हता. असं असताना देखील तो सतत मला अभ्यास कर.. अभ्यास कर… म्हणून त्रास द्यायचा. त्याचं स्वतःचं कधीच त्याच्या अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. त्याला जे मिळवता आलं नाही, ते सर्व मी मिळवावं असं सनीला वाटयचं…’

‘मला तेव्हा कायम वाटायचं हा सतत मला का बोलत आहे. तो माझा भाऊ आणि वडील नाही. पण सनी सारखा मोठा भाऊ माझ्या आयुष्यात आहे, म्हणून मी स्वतःला भाग्यशाली समजतो.’ असं म्हणत बॉबी देओल याच्या डोळ्यात पाणी आलं. एवढंच नाही तर यावेळी बॉबी देओल याने स्ट्रगलबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

बॉबी म्हणाला, ‘प्रत्येकाच्या आयुष्याच चढ – उतार येतात. कारण प्रत्येक वेळेस तुमचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. त्यामुळे आलेल्या संकटांना तोंड देत, पुढे जावं हाच एक पर्याय आहे. माझा मोठा भाऊ फार दयाळू आहे. तो कायम कोणत्याही परिस्थितीत माझ्यासोबत असतो.’ सनी देओल यांच्याबद्दल बोलताना बॉबी याच्या डोळ्यात पाणी देखील आलं.

बॉबी देओल याचा आगामी सिनेमा

बॉबी देओल लवकरच ‘एनिमल’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये बॉबी देओल याच्या सिनेमांना चाहत्यांकडून भरभरुन प्रतिसात मिळत आहेत. ‘एनिमल’ सिनेमात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

बॉबी देओल सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सनी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.