वयाच्या १८ व्या वर्षी मिस इंडिया, २२ व्या वर्षी मुंबईत भव्य फ्लॅट, धर्मेंद्र ही करतात ‘या’ अभिनेत्रीचं कौतुक

फोटोमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्रीचं धर्मेंद्र यांच्यासोबत खास कनेक्शन... 'या' गोष्टींमुळे धर्मेंद्र यांना अभिनेत्रीचं कौतुक... सर्वत्र दोघांच्या फोटोंची चर्चा...

वयाच्या १८ व्या वर्षी मिस इंडिया, २२ व्या वर्षी मुंबईत भव्य फ्लॅट, धर्मेंद्र ही करतात 'या' अभिनेत्रीचं कौतुक
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 12:58 PM

मुंबई | अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही चाहते धर्मेंद्र यांना विसरु शकले नाहीत आणि विसणार देखील नाहीत. कारण एक काळ असा होता जेव्हा धर्मेंद्र यांनी बॉलिवूड गाजवलं होतं. धर्मेंद्र कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे धर्मेंद्र चर्चेत आले आहेत. नुकताच, धर्मेंद्र यांचा नातू आणि अभिनेते सनी देओल यांचा मुलगा करण देओल याचं लग्न झालं. करण देओल याच्या लग्नासाठी पूर्ण देओल कुटुंब एकत्र आलं होतं. लग्न सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या लग्न सोहळ्यातील एका फोटोची तुफान चर्चा रंगत आहे..

सध्या सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे, त्या फोटोमेध्ये धर्मेंद्र यांच्यासोबत एक अभिनेत्री दिसत आहे. सुरुवातील फोटोमध्ये दिसणारी महिला आभिनेता सनी देओल यांची पत्नी असल्याची चर्चा रंगली होती. पण फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री सनी देओल यांची पत्नी नसून एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. फोटोमध्ये दिसणारी महिला अभिनेत्री तर आहेच, पण धर्मेंद्र यांची सून देखील आहे.

हे सुद्धा वाचा

फोटोमध्ये दिसणारी धर्मेंद्र यांच्या सुनेने वयाच्या १८ व्या वर्ष मिस इंडिया हा किताब जिंकला होता. शिवाय वयाच्या २२ व्या वर्षी अभिनेत्रीने मुंबईत भव्य घर घेतलं होतं. ज्यामुळे धर्मेंद्र कायम आपल्या सूनेचं कौतुक करत असतात. फोटोमध्ये दिसणाऱ्या धर्मेंद्र यांच्या सुनेचं नाव दिप्ती भटनागर आहे..

अभिनेत्री दिप्ती भटनागर रणदीप आर्य याची पत्नी आहे. रणदीप आर्य हा धर्मेंद्र यांच्या चुलत भावाचे पूत्र आहेत.. सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांच्या कुटुंबाची चर्चा रंगत आहे. दिप्ती भटनागर हिने १९९० साली मिस इंडियाचा किताब स्वतःच्या नावावर केला होता. ज्यानंतर दिप्ती भटनागर हिने अभिनेत्री म्हणून करियरची सुरुवात केली.

दिप्तीने तिच्या करियरची सुरुवात साऊथ फिल्मपासून केली. अभिनेत्रीने ‘राम शास्त्र’सिनेमाच्या माध्यमातून अभिनयास सुरुवात केली. दिप्तीने तेलगू सिनेमा ‘पेल्ली संदाडी’, अमेरिकन सिनेमा ‘इन्फर्नो’ आणि हिंदी सिनेमा ‘मन’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सध्या दिप्ती आणि धर्मेंद्र यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

देओल कुटुंब कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतं. धर्मेंद्र यांचा नातू करण देओल याच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पण धर्मेंद्र यांचं दुसरं कुटुंब म्हणजे, अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा आणि अहाना उपस्थित नव्हत्या.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.