धर्मेंद्र यांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन, फोटो पोस्ट करत दिली ‘गुडन्यूज’
Dharmendra New Social media Post: धर्मेंद्र यांच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन, अभिनेत्याने पोस्ट केलेला फोटो पाहून चाहत्यांना आनंद, फोटो पाहून तुम्ही देखील म्हणाल..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या फोटोची चर्चा...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता धर्मेंद्र पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसले तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मेंद्र चाहत्यांना स्वतःबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. शिवाय चाहत्यांसोबत आनंद देखील शेअर करतता. आता देखील धर्मेंद्र याने अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. पोस्टच्या माध्यमातून धर्मेंद्र यांनी घरात नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याची माहिती दिली आहे.
धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना माहिती आहे की, त्यांना शेतीची प्रचंड आवड आहे. धर्मेंद्र यांचा मोठा फार्म आहे. ज्यामध्ये गाय, बैल देखील आहेत. आता या गायी-बैलांच्या कुटुंबात आणखी एक नवीन सदस्य सामील झाला आहे. धर्मेंद्र यांनी स्वतः नव्या पाहुण्याचा फोटो पोस्ट केला आहे. शिवाय धर्मेंद्र यांनी खास कॅप्शन देखील लिहिलं आहे.
View this post on Instagram
धर्मेंद्र गायीच्या वासराचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हणाले, ‘पूर्वी आम्ही वासरू मागायचो… आता ट्रॅक्टर आला आहे. आता आम्ही वासरासाठी प्रार्थना करत आहोत… माझ्या घरात गोंडस वासराने जन्म घेतला आहे…’ सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांची पोस्ट व्हायरल होत आहे.
धर्मेंद्र यांच्या पोस्टवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांना देखील धर्मेंद्र यांची पोस्ट प्रचंड आवडली आहे. एक चाहता पोस्टवर कमेंट करत म्हणाला, ‘पशुपालन आणि शेती करणाराच खरा जाट असतो…’ अन्य एक चाहता म्हणाला, ‘वासरू प्रचंड गोंडस आहे….’ तर अनेकांनी धर्मेंद्र यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. सध्या सर्वत्र धर्मेंद्र यांची पोस्ट व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
सांगायचं झालं तर, धर्मेंद्र कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर धर्मेंद्र यांना 2 मिलियन नेटकरी फॉलो करतात. तर धर्मेंद्र फक्त 254 लोकांना सोशल मीडियावर फॉलो करतात.