अभिनेते धर्मेंद्र यांच्याविरोधात न्यायालयाने बजावले समन्स, फसवणुकीशी संबंधित प्रकरण
Dharmendra Summoned By Court: अभिनेते धर्मेंद्र यांच्या अडचणीत मोठी वाढ... न्यायालयाने बजावले समन्स, नक्की काय आहे प्रकरण, कधी होणार सुनावणी? धर्मेंद्र कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...
Dharmendra Summoned By Court: एकापेक्षा एक सिनेमांमुळे चर्चेत असलेले ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या विरोधात न्यायालयाने समन्स जारी केला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने नुकताच ‘गरम धरम ढाबा’ फ्रँचायझीशी संबंधित फसवणूक प्रकरणात ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र आणि इतर दोघांविरुद्ध समन्स जारी केलं आहेत. न्यायदंडाधिकारी यशदीप चहल यांनी जारी केलेले समन्स, दिल्लीस्थित उद्योजक सुशील कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित आहे. गरम धरम ढाबाच्या फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
न्यायाधीशांनी 5 डिसेंबर रोजी आदेशात म्हटलं आहे की, रेकॉर्डवरील पुराव्यावरून असं सूचित होतं की आरोपींनी तक्रारदाराला त्यांचा सामान्य हेतू पुढे नेण्यासाठी प्रवृत्त केलं. फसवणुकीच्या गुन्ह्यातील गोष्टी योग्यरित्या उघड केल्या…’
पुढे न्यायालयाच्या आदेशानुकसार, धर्मेंद्र सिंह देओल आणि अन्य आरोपींवर कलम 34 आयपीसी कलम 420, 120बी नुसार न्यायालयात हजर केलं पाहिजे. इतर आरोपींना देखील चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. तर आयपीसी कलम 506 अन्वये गुन्हेगारी धमकी देण्याच्या गुन्ह्यासाठीही समन्स बजावण्यात आलं आहे.
Delhi Court issued summons to Bollywood actor Dharmendra and two others in a cheating case related to Garam Dharam Dhaba.
Summon is issued on a complaint filed by a Delhi businessman who alleged cheating by luring him to invest in the franchise of Garam Dharam Dhaba.
— ANI (@ANI) December 10, 2024
याप्रकरणी पुढील सुनावणी 20 फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. सांगायचं झालं तर, 9 ऑक्टोबर 2020 रोजी न्यायालयाने FIR नोंदवण्याचे निर्देश मागणारा अर्ज फेटाळला. मात्र, न्यायालयाने तक्रारीची दखल घेत तक्रारदाराला पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. तक्रारदार सुशील कुमार यांच्या वतीने अधिवक्ता डीडी पांडे कोर्टात हजर होते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारदार सुशील कुमार यांचे प्रकरण असे आहे की एप्रिल 2018 मध्ये सहआरोपींनी गरम धरम ढाब्याची फ्रँचायझी सुरु करण्यासंबंधी ऑफर देत संपर्का साधला होता. याच बहाण्याने फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देखील आमिष दाखवलं. तक्रारदाराला कनॉट प्लेस, दिल्ली आणि मुरथल, हरियाणा येथील गरम धरम ढाबाच्या शाखांमधून सुमारे 70 ते 80 लाख रुपयांची मासिक उलाढाल होत असल्याच्या बहाण्याने फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले.
तक्रारदाराला त्याच्या गुंतवणुकीवर सात टक्के नफ्याच्या बदल्यात 41 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल, असे आश्वासन देण्यात आले होते. शिवाय उत्तर प्रदेश याठिकाणी शाखा स्थापन करण्यासाठी पूर्ण मदत देखील मिळेल… असं देखील सांगण्यात आलं होतं. या संदर्भात तक्रारदार आणि सहआरोपी यांच्यात अनेक ई-मेल आणि बैठकाही झाल्या असल्याचे सांगण्यात आले. तक्रारदार, त्याचे व्यावसायिक सहकारी आणि सहआरोपी यांच्यात कॅनॉट प्लेस येथील “गरम धरम ढाबा” च्या शाखा कार्यालयात बैठकही झाली. आता याप्रकरणी पुढे कायम होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.