गोविंदाची रॅली दरम्यान प्रकृती खालावली, तात्काळ रुग्णालयात दाखल, कशी आहे प्रकृती?
Govinda Health Update: गोविंदाची रॅली दरम्यान प्रकृती खालावली, तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे चाहत्यांकडून चिंता व्यक्त, आता कशी आहे अभिनेत्याची प्रकृती? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदाच्या प्रकृतीची चर्चा...
Govinda Health Update: महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात शनिवारी बॉलिवूड अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली. महायुतीच्या रॅली दरम्यार गोविंदा यांची प्रकृती खालावली. म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्येत बिघडल्यानंतर गोविंदा रोड शो मध्येच सोडून मुंबईला परतला. अभिनेत्याची प्रकृती खालावल्यानंतर चाहत्यांमध्ये देखील खळबळ माजली. दरम्यान अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. पण यावर अद्याप गोविंदाने अधिकृत वक्तव्य केलं नाही.
रिपोर्टनुसार, जळगाव येथील मुक्ताई नगर, बोदवड, पाचोरा, चोपडा येथे महायुतीच्या उमेदवारांसाठी गोविंदा प्रचार करत होता. तेव्हा अचानक गोविंदाच्या छातीत वेदना होऊ लागल्या. छातीत वेदना होऊ लागल्यानंतर तात्काळ अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
View this post on Instagram
गोविंदाच्या पायाला लागली होती गोळी
1 ऑक्टोबर रोजी अभिनेत्याच्या पायाला गोळी लागली होती. बंदूक साफ करत असताना गोळी लागली… अशी काही त्यानंतर समोर आली. गोळी लागल्यानंतर गोविंदा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ.रमेश अग्रवाल, गोविंदावर उपचार करत होती. गोविंदाला 8 ते 10 टाके पडल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली होती.संबंधित घटनेनंतर पोलिसांनी गोविंदाची रिव्हॉल्वर जप्त केली आणि आणि याप्रकरणाची चौकशी सुरू केली.
गोविंदाचे सिनेमे
गोविंदाच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, गेल्या काही वर्षांपासून ते बॉलिवूडपासून दूर आहे. पण एक काळ बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर गोविंदाने राज्य केलं. गोविंदाने आतापर्यंतच्या त्याच्या करिअरमध्ये 150 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘कुली नंबर 1’, ‘हसीना मान जाएगी’, ‘स्वर्ग’, ‘साजन चले ससुराल’, ‘राजा बाबू’, ‘पार्टनर’ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये त्याने काम केलंय.