बारा वर्षाने लहान असलेल्या सबा आझादसोबत हृतिक रोशनचे ब्रेकअप?, गर्लफ्रेंडसाठी अभिनेत्याने…

अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. हृतिक रोशन हा आपल्यापेक्षा तब्बल बारा वर्षाने लहान असलेल्या सबा आझादला डेट करतोय. मात्र, सध्या यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. सबाने काही दिवसांपूर्वी एक खुलासा केला होता.

बारा वर्षाने लहान असलेल्या सबा आझादसोबत हृतिक रोशनचे ब्रेकअप?, गर्लफ्रेंडसाठी अभिनेत्याने...
Hrithik Roshan and Saba Azad
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 4:27 PM

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. हृतिक रोशन हा सुझैन हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून सबा आझाद हिला डेट करतोय. हृतिक रोशन आणि सबाच्या वयामध्ये खूप मोठे अंतर आहे. सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि सबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही बघायला मिळतात. हेच नाही तर हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट सबाने सोशल मीडियावर शेअर देखील केली होती. अनेकजण हृतिक रोशन आणि सबाच्या जोडीला मुलगी आणि वडिलांची जोडी बोलतात. काही दिवसांपूर्वीच विदेशात हृतिक आणि सबा खास वेळ घालवताना दिसले. 

सबा आझाद हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला. सबा आझाद हिचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. सबा आझाद हिने थेट म्हटले होते की, मी हृतिक रोशन याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याने मला काम मिळत नाहीये. मला माझा खर्च उचलणे देखील कठीण होत आहे. 

एखाद्या मोठ्या अभिनेत्याला आपण ज्यावेळी डेट करतो, त्यावेळी लोक आपल्याकडे काम घेऊनही येत नाहीत. हेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून पार्ट्यांमध्येही हृतिक आणि सबा एकत्र दिसत नाहीत. अनंत अंबानीच्या लग्नातही हृतिक रोशन हा एकटाच पोहोचला होता. यापूर्वी नेहमीच दोघे एकत्र असत. 

अशी एक चर्चा आहे की, हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ब्रेकअप झाले. सबा आझाद हिच्या करिअरसाठी हृतिक रोशन याने तिला सोडल्याचे सांगितले जातंय. करिअर महत्वाचे असल्याने या दोघांनी निर्णय घेतला. सबा आझाद ही हृतिक रोशन याच्यापेक्षा 12 वर्षाने लहान आहे. हृतिक रोशन याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्यापासून तिला काम मिळत नाहीये. 

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हृतिक रोशन, त्याचे दोन्ही मुले आणि सबा आझाद हे विदेशात गेले होते. यावेळीचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. हृतिक रोशन याचा विमानतळावरील एक व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल होताना दिसला. हृतिक रोशन हा चांगलाच भडकताना दिसला होता. हृतिक रोशनचे ते वागणे लोकांना अजिबातच आवडले नव्हते. 

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.