बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याची दिवसाला आहे तब्बल इतके लाख कमाई, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनीही मागे टाकत…
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा अव्वल स्थानी कमाईमध्ये आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानची एकून संपत्ती ही 7300 कोटी आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचा हा चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसला. एका मागून एक चित्रपट त्याचे प्रेक्षकांच्या भेटीला आले.
हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये अभिनेता शाहरुख खानने स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खानच्या नावाचा समावेश हा गाैतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यासोबत झालाय. आता शाहरुख खान हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता बनलाय. शाहरुखची एकून संपत्ती ही 7300 कोटी आहे. शाहरुख खान अव्वल आहे. शाहरुख खान याचे 2023 मध्ये एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. शाहरुख खान हा चित्रपटासोबतच जाहिरातींमधूनही मोठा पैसा कमावतो आणि त्याचे अनेक बिझनेस देखील आहेत. शाहरुख खान हा पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर ऋतिक रोशन आहे.
ऋतिक रोशन हा एका दिवसाला तब्बल 27 लाखांची कमाई करतो. विशेष म्हणजे या यादीमध्ये ऋतिक रोशन याने चक्क सलमान खान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांना देखील मागे टाकले आहे. ऋतिकचे मागील दहा वर्षांमध्ये सात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि त्याचे हे सर्वच चित्रपट धमाका करताना दिसले.
ऋतिक रोशन याच्या उत्पन्नाचे साधन फक्त चित्रपटच नाही तर त्याचे काही बिझनेस, सोशल मीडिया आणि जाहिराती आहे. ऋतिक रोशनची एकून संपत्ती ही 2000 कोटी आहे. ऋतिक रोशनचे सोशल मीडियावर एकून 32.3 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करण्यासाठी ऋतिक मोठी फिस देखील घेतो.
या यादीमध्ये ऋतिक रोशन याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जूही चावला ही आहे तर त्यानंतर चाैथ्या क्रमांकावर अमिताभ बच्चन हे आहेत. ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आलाय. ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ब्रेकअप झाल्याचे सातत्याने सांगितले जातंय.
काही दिवसांपूर्वी सबा आझाद हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आला होता की, मोठ्या अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये असल्याने आपल्याला कोणीही काम देत नाहीये. हेच नाही तर अनेक ठिकाणी आता ऋतिक रोशन हा एकटाच स्पॉट होतान दिसतो. यामुळेच ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ब्रेकअप झाल्याचे सातत्याने सांगितले जातंय. मात्र, यावर दोघांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.