गर्लफ्रेंड असतानाही हृतिक रोशन थेट ‘या’ डेटिंग ॲपवर, अखेर अभिनेत्याकडून…
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऋतिक रोशनची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, सध्या ऋतिक रोशन हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय.
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षाही अधिक खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशन हा पत्नीसोबतच्या घटस्फोटानंतर सबा आझाद हिला डेट करतोय. सबा आझाद आणि ऋतिक रोशनच्या वयामध्ये मोठे अंतर आहे. नेहमीच हे दोघे एकत्र स्पॉट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वी सबा आझाद हिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही हैराण करणारे खुलासे सबा आझाद हिच्याकडून करण्यात आले. सबा आझाद हिने थेट म्हटले होते की, ऋतिक रोशन याला डेट करत असल्याने आपल्याला कोणीही काम देत नाहीये.
सबा आझाद हिचे हे बोलणे ऐकल्यानंतर अनेकांना वाटले की, ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ब्रेकअप झाले. काम मिळत नसल्याने आणि स्वत:ची वेगळी ओळख राहिली नसल्यानेच ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. मात्र, असे असले तरीही दोघांनीही यावर अजिबातच भाष्य केले नाही.
हेच नाही तर हैराण करणारे म्हणजे सबा आझाद गर्लफ्रेंड असताना ऋतिक रोशन याला थेट डेटिंग ॲपवर दिसला. डेटिंग ॲप रायावर ऋतिक रोशन याचे प्रोफाईल बघायला मिळाले. अनेकांना धक्का बसला की, सबा आझाद हिच्यासोबत रिलेशनमध्ये असताना ऋतिक रोशन हा डेटिंग ॲपवर नेमका काय करतोय. आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत.
अनेकांनी अंदाजा बांधला की, बहुतेक ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ब्रेकअप झाले. यामुळेच ऋतिक रोशन हा डेटिंग ॲपवर सक्रिय झालाय. मध्यंतरी ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा रंगताना दिसली. सबा आणि ऋतिक रोशन हे लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले जात होते.
हेच नाही तर लग्नानंतर ऋतिक रोशन हा सबासोबत बांद्राच्या त्याच्या घरात शिफ्ट होणार असल्याचीही चर्चा होती. ऋतिक रोशन हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. अनेक हीट चित्रपट ऋतिक रोशन याने बॉलिवूडला आतापर्यंत दिली आहेत. ऋतिक रोशन हा काही दिवसांपूर्वीच आपल्या दोन्ही मुलांसोबत आणि सबासोबत विदेशात गेला होता.