हृतिक रोशन याच्यामुळे सबा आझादचे मोठे नुकसान, अभिनेत्री थेट म्हणाली, दोन वर्षांपासून…
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. हृतिक रोशन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हृतिक रोशन हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशन याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऋतिक रोशनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग देखील बघायला मिळते. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे कायमच स्पॉट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन आणि सबा हे विदेशात धमाल करताना दिसले. ऋतिक रोशन याने सोशल मीडियावर सबासोबतचे खास फोटोही शेअर केले होते. आता सबा आझाद तूफान चर्चेत आलीये.
नुकताच सबा आझाद हिने एक पोस्ट शेअर केलीये. हेच नाही तर दोन वर्षांपासून आपल्याला काम मिळत नसल्याचे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. फक्त हेच नाही तर तिने हे देखील सांगितले की, आपल्याला काम का मिळत नाहीये. आता सबा आझादची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरलीये. मोठ्या अभिनेत्याला डेट करत असल्याने आपल्याला काम मिळत नसल्याचेही तिने म्हटले.
सबा आझादने म्हटले की, दोन वर्षांहून अधिक काळानंतर आवाज रेकॉर्ड करत आहे. यासोबतच तिने एक फोटोही शेअर केला. दुसऱ्या पोस्टमध्ये सबाने म्हटले की, अजूनही आपण त्या अंधकारमय जगात जगत आहोत का जिथे एक असा विश्वास आहे की एकदा एखादी स्त्री यशस्वी जोडीदारासोबत रिलेशनशिपमध्ये आली की तिला तिच्या टेबलावर जेवण ठेवण्याची गरज नसते?
त्यानेच तिचे घर भाडे आणि बिले भरावीत? की तुमच्या कामाचा अभिमान बाळगून तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या? मुळात म्हणजे ही कल्पना अत्यंत प्राचीन आणि जुनी आहे. यामुळेच मी माझे संपूर्ण करिअर गमावले आहे, जे माझ्या अत्यंत जवळचे होते.आता लोकांना वाटते की, मला काम करण्याची गरज नाहीये. खरोखरच ही विचित्र मानसिकता आहे.
यासोबतच सबा आझाद हिने अजूनही काही पोस्ट या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून सबा आझाद ही आपला राग व्यक्त करताना दिसतंय. सबा आझाद याला डेट करत असल्यापासून आपल्याला काम मिळत नसल्याचे सबाने थेट म्हटले आहे. निर्मात्यांना वाटते की, आता सबा आझादला कामाची गरज नाहीये, असेही सबा आझाद हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.