Jackie Shroff Birthday : चाळीतलं बालपण ते सुपरहिट हिरो, 13 वर्षाच्या मुलीसोबत प्रेम अन् लग्न, आयेशासोबत सुखी संसार, हॅप्पी बर्थडे जग्गुदादा

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या जग्गूदादावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Jackie Shroff Birthday : चाळीतलं बालपण ते सुपरहिट हिरो, 13 वर्षाच्या मुलीसोबत प्रेम अन् लग्न, आयेशासोबत सुखी संसार, हॅप्पी बर्थडे जग्गुदादा
जॅकी श्रॉफ
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 8:10 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा (Jackie Shroff Birthday) आज 65 वा वाढदिवस आहे. आपल्या लाडक्या जग्गूदादावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. पण जॅकी श्रॉफ या सुपरस्टारचा जीवन प्रवास प्रचंड खडतर राहिलाय. एका चाळीत गेलेलं बालपण नंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण त्यानंतर आयेशासोबत लग्न आणि सुखी संसार अशी त्यांची इंट्रेस्टिंग कहानी जाणून घेऊयात…

चाळीतील बालपण

मुंबईतल्या एका चाळीत जॅकी श्रॉफ लहानाचे मोठे झाले. तिथे ते अनेकांची मदत करत. तिथे झालेले हे संस्कार त्यांनी पुढेही कायम ठेवले. आजही ते अडीअडचणीत असणाऱ्यांची आवर्जून मदत करतात. त्यांनी अकरावीनंतर शिक्षण थांबवलं. त्यानंतर ते मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये नोकरीसाठी गेले मात्र त्यांना शिक्षणाअभावी त्यांना तिथं नोकरी नाकारण्यात आली. मग त्यांनी एअर इंडियामध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. तिथेही त्यांना नोकरीची संधी मिळाली नाही.

पहिली संधी

एकेदिवशी जॅकी बसची वाट बघत थांबले होते. तिथे त्यांना एका व्यक्तीने ‘मॉडेलिंग करणार का?’ असं विचारलं त्यावर जॅकी ‘पैसे देणार असाल तर करतो’, असं म्हणाले आणि तिथून सुरू झाला एका सुपरस्टारचा प्रवास…

बॉलिवूडमध्ये पदार्पण ते सुपरस्टार

सुभाष घई यांच्या हिरो या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांचा हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यांच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं. तिथून पुढे त्यांना अनेक सिनेमे ऑफर झाले. बघता बघता जयकिशन काकूभाई श्रॉफ उर्फ जॅकी श्रॉफ स्टार बनले. या पहिल्या आणि सुपरहिट चित्रपटाने त्यांचं आयुष्य बदलून टाकलं.

युनिफॉर्म घालून शाळेत जाणाऱ्या 13 वर्षीय मुलीवर प्रेम आणि लग्न

एकदा रस्त्यावरून जाताना जॅकी यांची नजर एका शाळकरी मुलीवर पडली. जी तेव्हा केवळ 13 वर्षांची होती. दोघांची चांगली मैत्री झाली. मग दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्याचकाळात आयेशा यांना जॅकी यांच्या गर्लफ्रेंडबद्दल कळालं जी त्यावेळी अमेरिकेत होती. ती भारतात परत आल्यावर लग्न करण्याचं जॅकी यांनी वचन दिलं होतं. हे सगळं कळाल्यावर आयेशा यांचं मन दुखावलं गेलं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी जॅकी यांच्या गर्लफ्रेंडला पत्र पाठवून जॅकीसोबतच्या नात्याबद्दल सांगितलं आणि लवकरच आपण लग्न करणार असल्याचं पत्रात नमूद केलं. थोड्या दिवसांनी आयेशा आणि जॅकी यांनी लग्न केलं. आलिशान घरात राहणारी आयेशा मग जॅकी यांच्यासाठी चाळीत राहिली दोघांचा सुखाचा संसार झाला. त्यांना टायगर आणि कृष्णा ही दोन मुलं आहेत.

सुपरहिट चित्रपट

‘हिरो’ हा जॅकी यांचा पहिला आणि सुपरहिट सिनेमा. त्यानंतर त्यांनी हाथों की लकिरें, सडकछाप, राम-लखन, परिंदा, आझाद देश के गुलाम, सौदागर, अंगार, खलनायक, रंगिला, बंदिश, शपथ, बॉर्डर, जंग, मिशन कश्मिर, देवदास, वीर, भारत, राधे, त्यांचा मुलगा टायगरची प्रमुख भूमिका असलेला बागी 3, राधे आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशी अश्या अनेक चित्रपटात त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या. त्यांच्या चित्रपटांची यादी न संपणारी आहे. त्यांनी 12 भाषांमध्ये काम केलं आहे आणि त्यांना 9 भाषा मुखोत्गत आहेत.

अजरामर गाणी

हिरो चित्रपटातील ‘प्यार करनेवाले कभी डरते नहीं’, ‘तू मेरा हिरो हैं’ ही गाणी खूप गाजली. ‘तुम्हे दिल से कैसे जुदा हम करेंगे’ हे गाणंही सुपरहिट ठरलं. ‘तेरी मेहेरबानिया’ या चित्रपटाचं शीर्षक गीत चाहत्यांना आवडलं होतं. ‘हाय रामा’ या रंगिला चित्रपटातील गाण्यात जॅकी यांचा उर्मिला मातोंडकरसोबतचा रोमॅन्टिक अंदाज प्रेक्षकांना आवडला.

संबंधित बातम्या

Hindustani Bhau : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करणारा हिंदुस्तानी भाऊ कोण?, भाऊच्या भोवती वादांचा गराडा

Cheslie Kryst Sucide : मिस अमेरिका 2019 चेस्ली क्रिस्टची आत्महत्या, 60 मजली इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं

हृतिक रोशनची मिस्ट्री गर्लफ्रेंड सबा आझाद नक्की कोण ? हृतिक सबाला करतोय डेट?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.