माधुरी दीक्षितसोबत ऑनस्क्रीन किस करताना थेट थरथर कापायला लागले जॅकी श्रॉफ, म्हणाले, मी…
बाॅलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जॅकी श्रॉफ यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ हे कायमच चर्चेत असतात. जॅकी श्रॉफ यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेच नाही तर आजही धमाकेदार भूमिका करताना जॅकी श्रॉफ हे दिसतात. सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच जॅकी श्रॉफ यांनी ओटीटीवर पर्दापण केले आहे. जॅकी श्रॉफ यांचा आज 67 वा वाढदिवस आहे. सकाळपासूनच चाहते हे जॅकी श्रॉफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे जॅकी श्रॉफ हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात.
मुळात म्हणजे जॅकी श्रॉफ हे थोडेसे लाजाळू स्वभावाचे आहेत. काही दिवसांपूर्वीच जॅकी श्रॉफ यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना जॅकी श्रॉफ हे दिसले. जॅकी श्रॉफ यांनी इंटिमेट सीन करताना त्यांच्यासोबत काय घडले आणि त्या सीननंतर त्यांची स्थिती काय होती, हे सांगताना दिसले.
नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये त्यांनी काही मोठे खुलासे केले. जॅकी श्रॉफ म्हणाले की, वर्दी चित्रपटासाठी त्यांचा आणि माधुरी दीक्षितचा एक किस सीन होता. तर जूही चावलासोबत आयना चित्रपटामध्ये एक इंटिमेट सीन होता. जॅकी श्रॉफ म्हणाले की, हे सीन करताना माझी अवस्था अत्यंत वेगळी होती, हे करताना भीती पण वाटत होती.
माधुरी दीक्षितसोबतच्या किसच्या सीननंतर मला अक्षरक्षा घाम आला. माझ्यासाठी खरोखरच हे दोन्ही सीन करणे खूप जास्त अवघड होते. बऱ्याच अभिनेत्रींसोबत जॅकी श्रॉफ यांनी रोमान्स चित्रपटात केला आहे. मात्र, माधुरी आणि चूहीसोबत इंटिमेट सीन करणे अवघड असल्याचे मुलाखतीमध्ये जॅकी श्रॉफ यांनी सांगितले.
जॅकी श्रॉफ हे शेवटी सूर्यवंशी या चित्रपटात दिसले. फोन भूत चित्रपटात ते कटरीना कैफ आणि ईशान खट्टर यांच्यासोबतच महत्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटासाठी त्यांच्या अभिनयाचे काैतुक देखील करण्यात आले. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना जॅकी श्रॉफ हे दिसले. जॅकी श्रॉफ यांनी आज 67 व्या वयात पर्दापण केले आहे.