Jackie Shroff यांच्यावर पत्नी कधीही घेत नाही संशय? खु्द्द अभिनेत्याने दिलेलं उत्तर ऐकून व्हाल हैराण

'डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित यांच्यासोबत मी...', अनेक अभिनेत्रींसोबत राहून देखील जॅकी श्रॉफ यांच्या पत्नीने घेतला नाही संशय कारण...

Jackie Shroff यांच्यावर पत्नी कधीही घेत नाही संशय? खु्द्द अभिनेत्याने दिलेलं उत्तर ऐकून व्हाल हैराण
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 10:52 AM

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्याचे विवाहबाह्य संबंध राहिले. अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेत्याचं नाव जोडण्यात आलं.. एवढंच नाही तर, काही अभिनेत्यांनी प्रेमासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. पण अभिनेते जॅकी श्रॉफ यांचं नाव कधीही कोणत्याही अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं नाही.. शिवाय, जॅकी श्रॉफ यांचे विवाहबाह्या संबंधांबद्दल देखील कोणतीही गोष्ट समोर आली नाही. जॅकी श्रॉफ हे नाव सिनेविश्वातील फार मोठं नाव आहे.. अनेकांच्या प्रेरणास्थानी आज जॅकी श्रॉफ आहेत.. जॅकी श्रॉफ यांच्या खासगी आयुष्याबद्दल आता एक मोठी अपडेट समोर येत आहे.. याचा खुलासा खुद्द जॅकी श्रॉफ यांनी एका मुलाखतीत केला आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जॅकी श्रॉफ यांची चर्चा सुरु आहे..

८० च्या दशकातील इंडस्ट्रीमध्ये जॅकी श्रॉफ यांच्या नावाचा बोलबाला होता. ‘हीरो’ सिनेमाच्या यशानंतर जॅकी श्रॉफ एका रात्रीत स्टार झाले. त्यानंतर जॅकी श्रॉफ यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘हीरो’ सिनेमानंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या जॅकी श्रॉफ यांच्यासोबत काम करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांची रांग लागू लागली.. जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या करियरमध्ये मीनाक्षी शेषाद्रि यांच्यापासून डिंपल कपाडिया, माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांसारख्या अनेक अभिनेत्रींसोबतस काम केलं..

बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत असताना देखील जॅकी श्रॉफ यांचं नाव कधी कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं नाही.. यावर अभिनेते म्हणाले, माझ्या पत्नीचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. आयेशा हिला माहिती होतं पती कुठेही जाणार नाही, घरी परत येईल.. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी विचारण्यात आलं, ‘तुमचं नाव कधी कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडण्यात आलं नाही, तुमच्या पत्नीने काधी तुमच्यावर संशय घेतला नाही का?’

हे सुद्धा वाचा

विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘आयेशा मला फार चांगलं ओळखते.. इंडस्ट्रीमध्ये प्रचंड सुंदर अभिनेत्री आहेत. त्यांच्यासोबत मी इतके वर्ष काम केलं. बाहेर गेलो.. पण आयेशाने कामय माझ्यावर विश्वास ठेवला.. तिला कधी कोणत्या गोष्टीचा फरक पडला नाही. तिने कधी फोन करुन तपासलं नाही मी कुठे आहे.. तिला माहिती होतं बाहेर कामा निमित्त आलो आहे आणि घरी पुन्हा जाणार आहे.. ‘

पुढे जॅकी श्रॉफ म्हणाले, ‘ज्या अभिनेत्रींसोबत मी काम केलं, त्यांचा मी आदर करतो. सर्व अभिनेत्रींसोबत माझी चांगली मैत्री आहे. पण मी कधी अभिनेत्रींसोबत बाहेर फिरायला गेलो नाही. मी कायम अनिल कपूर आणि डॅनी डेंन्झोप्पा यांच्यासोबत फिरायला गेलो. अमृता सिंग, डिंपल कपाडिया, टीना (मुनीम) अंबानी, जूही चावला, मीनाक्षी शेषाद्री यांच्यासोबत माझी चांगली मैत्री आहे. पण डॅनी माझा जवळचा मित्र आहे..’ असं देखील जॅकी श्रॉफ म्हणाले..

जॅकी श्रॉफ आणि आयशा यांचं लग्न ५ जून १९८७ रोजी झालं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. जॅकी यांचा मुलगा टायगर श्रॉफ बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे, तर मुलगी कृष्णा श्रॉफ मार्शल आर्ट्स आणि फिटनेसच्या विश्वात कार्यरत आहे. श्रॉफ कुटुंब बॉलिवूडच्या प्रसिद्ध कुटुंबापैकी एक आहे..

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.