13 वर्षांच्या आयशाच्या प्रेमात पडले होते जॅकी श्रॉफ, नेहमी सोबत ठेवतात आईच्या साडीचा तुकडा! वाचा ‘भिडू’चे भन्नाट किस्से!
जॅकीची पत्नी आयशाला ज्याप्रकारे पहिल्याच नजरेत प्रेम झाले होते, त्याचप्रमाणे जॅकीसाठीसुद्धा हे पहिल्याच नजरेतले प्रेम होते. गेल्या महिन्यात 64वा वाढदिवस साजरा करणार्या जॅकी श्रॉफची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही.
मुंबई : सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल 12’मध्ये बॉलिवूडचे ‘भिडू’ अर्थात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफचे (Bollywood actor Jacky shroff) डोळे भरून आले, जेव्हा त्यांनी त्यांच्या कुटूंबाकडून आलेले खास संदेश दाखवले गेले. या कार्यक्रमात एक व्हिडीओ प्ले करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांची पत्नी आयशा श्रॉफ, मुलगा टायगर श्रॉफ आणि लेक कृष्णा श्रॉफ यांचा संदेश होता. आयशाने आपल्या मेसेजमध्ये सांगितले की, जेव्हा ती 13 वर्षांची होती, तेव्हा तिची जॅकी श्रॉफ पहिल्यांदा भेट झाली होती (Bollywood actor Jacky shroff interesting stories about actors life).
आयशा या व्हिडीओत म्हणतात, ‘हाय जग्गू, तुम्हा लोकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल की, जेव्हा मी जॅकीला पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी 13 वर्षांचा होतो. आम्ही रेकॉर्ड शॉपवर पहिल्यांदा भेटलो होतो. आम्ही, त्यवेळी केवळ 2 मिनिटे बोललो. त्या संध्याकाळी मी घरी पोहोचले तेव्हा, मी माझ्या आईला सांगितले की आज मी ज्या माणसाशी लग्न करणार आहे त्याला भेटले.
आयशा पुढे म्हणतात की, हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय होता. आज मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते, की त्याच्यासारखा महान माणूस माझ्या आयुष्यात आला. तो एक चांगली पती आहे. नेहमीच समर्थन करणारा, तो जगातील सर्वोत्तम पिता आहे.
पाहा खास व्हिडीओ
Jackie Shroff gets teary with all the love and support his family showers. Tune in to watch him in the #JackieShroffSpecial tonight on #IndianIdol2020 at 8pm only on Sony TV. @iAmNehaKakkar @VishalDadlani #HimeshReshammiya #AdityaNarayan @FremantleIndia @bindasbhidu pic.twitter.com/w9ExjChUQY
— sonytv (@SonyTV) March 14, 2021
(Bollywood actor Jacky shroff interesting stories about actors life)
जॅकी श्रॉफची रंजक प्रेमकथा
जॅकीची पत्नी आयशाला ज्याप्रकारे पहिल्याच नजरेत प्रेम झाले होते, त्याचप्रमाणे जॅकीसाठीसुद्धा हे पहिल्याच नजरेतले प्रेम होते. गेल्या महिन्यात 64वा वाढदिवस साजरा करणार्या जॅकी श्रॉफची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. एकदा जॅकी श्रॉफ रस्त्याच्या कडेला उभे होते, तेव्हा त्यांनी एका 13 वर्षाची मुलीला शाळेच्या गणवेशात बसमध्ये बसलेले पाहिले. पहिल्याच नजरेत जॅकी या मुलीच्या प्रेमात पडले. रेकॉर्डिंग स्टोअरमध्ये जिथे दोघांनी प्रथम एकमेकांशी संभाषण केले होते, तेथे जॅकीने या मुलीला संगीत अल्बम खरेदी करण्यास मदत केली आणि त्यानंतर ती मुलगी काही वर्षांनी त्यांची पत्नी बनली (Bollywood actor Jacky shroff interesting stories about actors life).
आईच्या साडीचा एक तुकडा नेहमीच आपल्या जवळ ठेवणारे ‘जॅकी दादा’
शो दरम्यान, जॅकी श्रॉफने ते आपल्या आईच्या अगदी जवळ असल्याचे म्हटले आहे. जग्गु दादा आपल्या आईच्या साडीचा एक तुकडा नेहमीच सोबत ठेवतात. या संदर्भात सांगताना जॅकी श्रॉफ म्हणाले की, हा त्यांच्या आईच्या साडीचा एक भाग आहे. ते म्हणतात की, आता आई त्यांच्याबरोबर नाही, परंतु तिच्या साडीचा हा भाग नेहमीच त्यांच्याबरोबर राहतो.
कन्या कृष्णाचाही खास संदेश
जॅकी यांची मुलगी कृष्णानेही त्यांच्यासाठी एक खास संदेश पाठवला होता. ती म्हणते की, जेव्हा जेव्हा आम्ही त्याला मिस करायचो, तेव्हा तो लगेच शूटमधून परत यायचा आणि आम्हाला त्याच्या मांडीवर घेऊन बसायचा.
(Bollywood actor Jacky shroff interesting stories about actors life)
हेही वाचा :
RRR | आलियाच्या ‘सीता लूकची पहिली झलक, चाहते आता आणखी उत्सुक!
Birthaday Special | करिअरच्या उच्च शिखरावर असताना का झाला इंडस्ट्रीमधून गायब?, वाचा हनी सिंगबद्दल…