अखेरच्या घटका मोजतोय प्रसिद्ध अभिनेता; जितेंद्र यांनी घेतली शेवटची भेट
Bollywood : कर्करोगाच्या चौथ्या स्टेजवर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता, लढतोय जीवन - मरणाची लढाई... त्याच्याकडे फक्त 38 दिवस शिल्लक... जितेंद्र यांनी घेतली अभिनेत्याची शेवटची भेट... सध्या सर्वत्र अभिनेता आणि अभिनेत्याच्या आजाराची चर्चा...
मुंबई | 6 डिसेंबर 2023 : मंगळवारी ‘सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स म्हणजे दिनेश फडणीस याचं निधन झालं आहे… वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाने सेलिब्रिटी, चाहते आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिनेश फडणीस याची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णालयात उपचारा दरम्यान अभिनेत्याने अखेरचा श्वात घेतला. दिनेश याच्या निधनाची बातमी ताजी असता, बॉलिवूडचा आणखी एक अभिनेता जीवन – मरणाची लढाई लढत आहे. डॉक्टरांनी अभिनेत्याकडे फार दिवस शिल्लक असल्याची माहिती दिली. सध्या जो अभिनेता जीवन – मरणाची लढाई लढत आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता ज्युनियर महमूद आहेत. ज्युनियर महमूद गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज लढत आहेत.
जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असलेल्या ज्युनियर महमूद यांची शेवटची भेट घेण्साठी बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहोचत आहेत. ज्युनियर महमूद यांची भेट घेण्यासाठी अभिनेत्री जितेंद्र देखील पोहोचले. सध्या ज्युनियर महमूद यांच्यासोबत जितेंद्र यांचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्युनियर महमूद आणि जितेंद्र यांच्या भेटीची चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
ज्युनियर महमूद यांनी जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ज्युनियर महमूद यांना भेटण्यासाठी अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी येत आहेत. विनोदवीर जॉनी लिव्हर आणि मास्टर राजू याने देखील ज्युनियर महमूद यांची भेट घेतली.
ज्युनियर महमूद याचं वय 67 वर्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्युनियर महमूद आणि विनोदवीर जॉनी लिव्हर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जॉनी लिव्हर यांनी ज्युनियर महमूद यांना उपचारासाठी आर्थिक मदत देखील केल्याची माहिती समोर येत आहे.
ज्युनियर महमूद गेल्या काही दिवसांपासून बिछान्याला खिळले आहेत. त्यांचं जवळपास 20 किलो वजन कमी झाल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. ज्युनियर महमूद यांचे घरीच उपचार सुरु असून, त्यांची पत्नी आणि मुलं अभिनेत्याची काळजी घेत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्युनियर महमूद यांच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे.