Kartik Aaryan | कार्तिक आर्यन याने मुंबईमध्ये खरेदी केली मोठी प्रॉपर्टी, थेट बनला सारा अली खान हिचा शेजारी, तब्बल इतके कोटी
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. कार्तिक आर्यन हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग हे विदेशात करत आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा तूफान चर्चेत आहे. कार्तिक आर्यन याचे चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे कार्तिक आर्यन याच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर आहेत. कार्तिक आर्यन हा विदेशात आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करताना दिसतोय. कार्तिक आर्यन याचा काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन याच्यासोबत कियारा अडवाणी ही मुख्य भूमिकेत दिसली.
चाहत्यांना कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची ही जोडी प्रचंड आवडली. इतकेच नाही तर यांच्या चित्रपटाने मोठा धमका हा केलाय. कार्तिक आर्यन याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठी कमाई करताना दिसत आहेत. एक चर्चा तूफान रंगताना दिसत होती की, हेरा फेरी 3 चित्रपटामध्ये अक्षय कुमार ऐवजी कार्तिक आर्यन हा दिसणार आहे.
इतकेच नाही तर चित्रपट निर्मात्यांनी कार्तिक आर्यन याच्यासोबत संपर्क साधला. मात्र, त्यानंतर अक्षय कुमार याने अचानकपणे या चित्रपटाला होकार दिला. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे एकमेकांना डेट करत असल्याचे सतत सांगितले जात होते. मात्र, यावर कधीच कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांनी भाष्य केले नाही.
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचे बरेच फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे शेजारी झाले आहेत. ज्या इमारतीमध्ये सारा अली खान हिने काही दिवसांपूर्वी आॅफिससाठी जागा घेतली त्याच इमारतीमध्ये आता कार्तिक आर्यन यानेही मोठी जागा खरेदी केली आहे.
कार्तिक आर्यन याने सिग्नेचर इमारतीमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे. तब्बल 10.09 कोटी रूपयांना ही प्रॉपर्टी कार्तिक आर्यन याने खरेदी केलीये. विशेष म्हणजे या इमारतीमध्ये फक्त सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचीच प्रॉपर्टी नसून अमिताभ बच्चन, अजय देवगन यांनीही या इमारतीमध्ये ऑफिससाठी जागा खरेदी केल्या आहेत.
म्हणजे काय तर आता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे एकमेकांचे शेजारी झाले आहेत. गदर 2 च्या पार्टीमधीलही कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा आनंद बघायला मिळाला. कारण परत एकदा कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे एकसोबत दिसले.