कार्तिक आर्यन याचे 12 वर्षाने मोठ्या बॉलिवूड अभिनेत्रीशी फ्लर्टिंग, गळाभेट घेत अभिनेत्याने…
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा कायमच चर्चेत असतो. कार्तिक आर्यन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून हे चित्रपट चांगलाच धमाका करताना देखील दिसत आहेत.
बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा कायमच चर्चेत असतो. कार्तिक आर्यन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कार्तिक आर्यन याने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख नक्कीच मिळवलीये. कार्तिक आर्यनचे चित्रपट चांगलेच धमाका करताना दिसतात. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान एकमेकांना डेट करत असल्याची मध्यंतरी जोरदार चर्चा रंगली, हेच नाही तर यांचे काही फोटोही व्हायरल होताना दिसले. मात्र, यांचे ब्रेकअप झाल्याचे देखील सांगितले गेले.
नुकताच कार्तिक आर्यन हा आपल्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या बाॅलिवूड अभिनेत्रीला फ्लर्ट करताना दिसला. विशेष म्हणजे कार्तिक आर्यनने दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या अभिनेत्रीला फ्लर्ट केले नाही तर चक्क विद्या बालन हिला फ्लर्ट केले. आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
विद्या बालन ही ‘दो प्यार’च्या स्पेशल स्क्रीनसाठी पोहचली. यावेळी तिथे कार्तिक आर्यन हा देखील उपस्थित होता. यावेळी कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांची भेट झाली. कार्तिक आर्यनला बघताच थेट विद्या बालन हिने त्याचे गाल ओढले. यानंतर मग काय कार्तिक आर्यन याने विद्या बालन हिला फ्लर्ट करण्यात सुरूवात केली.
कार्तिक आर्यन म्हणाला की, काय भारी दिसत आहेस यार..यानंतर विद्या बालन कार्तिक आर्यनचे गाल ओढताना दिसत आहेत. आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. दोघांना असे मस्ती करताना पाहून चाहत्यांना देखील आवडले आहे. शेवटी दोघेही एकमेकांची गळाभेट घेताना देखील दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन याने एक अत्यंत लग्झरी अशी कार घेतलीये. या कारची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. कार्तिक आर्यन याच्या भूल भुलैया 2 ची वाट चाहते गेल्या काही दिवसांपासून बघत आहेत. कार्तिक आर्यन याचे चित्रपट चांगलेच धमाका करताना दिसत आहेत. हेच नाही तर कार्तिक आर्यनच्या चित्रपटांना चाहत्यांचे मोठे प्रेम देखील मिळते.
कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यामध्ये वाद असल्याची जोरदार चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगताना दिसली. हेच नाही तर कार्तिक आर्यन आणि करण जोहर एकमेकांना बोलणे देखील टाळत होते. एका शोमध्ये करण जोहर कार्तिक आर्यनबद्दल बोलताना दिसला. मात्र, आता यांच्यामधील वाद मिटल्याचे देखील दिसत आहे.