सारा अली खान हिच्यावर कार्तिक आर्यन भडकला, थेट अभिनेत्रीला सुनावले खडेबोल, वाचा काय घडले?
सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सारा अली खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात सारा अली खान विकी जैन याच्यासोबत धमाका करताना दिसली.
मुंबई : कॉफी विथ करण 8 चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोला सारा अली खान आणि अनन्या पांडे या पोहचल्या होत्या. यावेळी करण जोहर याने विचारले की, तुम्हाला तुमच्या एक्ससोबत ब्रेकअपनंतर रिलेशन ठेवायला कसे वाटते? यावर कार्तिक आर्यन याचे नाव न घेता सारा अली खान ही बरेच काही बोलून गेली. फक्त हेच नाही तर बऱ्याच गोष्टींवरून कार्तिक आर्यन याची खिल्ली उडवली गेली. सारा अली खान हिने स्पष्टपणे सांगितले की, मला माझ्या एक्ससोबत कोणतेही रिलेशन ठेवायला फार जास्त कठीण जाते. मात्र, या संवादामध्ये कुठेही कार्तिक आर्यन याचे नाव घेण्यात नाही आले.
कार्तिक आर्यन याला सारा अली खान हिचे हे बोलणे अजिबातच आवडले नसल्याचे बघायला मिळाले. नुकताच कार्तिक आर्यन याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतमध्ये काही मोठे खुलासे हे करण्यात आले. कार्तिक आर्यन याला विचारण्यात आले की, कॉफी विथ करण 8 मध्ये ज्याप्रकारे रिलेशन आणि ब्रेकअपबद्दल बोलण्यात आले त्याबद्दल तुमचे नेमके काय म्हणणे आहे.
यावर बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला की, कोणतेही नाते दोन व्यक्तींचे असल्यावर तिसऱ्या व्यक्तीने त्यावर बोलू नये, आणि त्याच्या मध्येही पडू नये. मुळात म्हणजे सर्वांनीच आपल्या नात्याचा नेहमीच सन्मान हा करायला हवा. त्या नात्याचा आदर करा. जर तुमचे नाते फार काही दिवस चालले नसेल तर त्यावर वाईट नको बोलायला.
जेंव्हा तुम्ही एखाद्या नात्यामध्ये असता तेंव्हा ते नाते संपेल असा विचार नसतो. किमान तुम्ही एकत्र घातलेल्या त्या वेळेचा तरी आदर करा आणि तो कायमच करायला हवा. माझे स्पष्ट आहे की, त्या नात्याचा नेहमीच सन्मान करायला हवा. कार्तिक आर्यन हा सारा अली खान हिचे बोलणे ऐकून संतापल्याचे बघायला मिळतंय. बरेच काही यावेळी कार्तिक आर्यन हा बोलून गेला.
पहिल्यांदाच अशाप्रकारे जाहिरपणे बोलताना कार्तिक आर्यन हा दिसला आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून सतत सांगितले जात होते. सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांचे काही फोटो आणि व्हिडीओ हे देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. मात्र, कार्तिक आर्यन आणि साराने त्यांच्या रिलेशनवर कधीच काही भाष्य केले नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगितले गेले.