Sushant Singh Rajput ने पाहिलेलं स्वप्न बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता करणार पूर्ण
सुशांत सिंह राजपूत याची एक इच्छ पूर्ण करणार बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता; त्याने तयारी देखील केली सुरु... पुन्हा सुशांतच्या आठवणी होणार ताज्या!
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने २०२० मध्ये शेवटचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. एवढंच नाही तर, अभिनेत्याने एवढं टोकाचं पाऊल का उचललं आजपर्यंत कळलेलं नाही. यशाच्या उच्च शिखरावर असताना अभिनेत्याने स्वतःला संपवलं. सुशांत याच्या निधनाला अनेक वर्ष उटली आहेत. पण आजही चाहते सुशांतला विसरु शकलेले नाहीत. सोशल मीडियावर आजही आभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्याने अनेक स्वप्न पाहिली होती. पण ती स्वप्न पूर्ण करण्याआधीच सुशांत यांने जगाचा अखेरचा निरोप घेतला. पण आता सुशांत याचं एक अधुरं राहिलेलं स्वप्न अभिनेता कार्तिक आर्यन पूर्ण करणार आहे. सध्या सर्वत्र कार्तिक आर्यन याची चर्चा रंगत आहे.
सुशांतच्या स्वप्नाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्याने २०१६ मध्ये मुरलीकांत पेटकर यांची जीवनपट करण्यासाठी करार केला होता. सुशांत याने सांगितलं होतं की, पेटकर याची कथा आणि त्यांची जिद्दीने अभिनेत्याला आकर्षित केलं होतं. पेटकर यांची आवड आणि त्यांच्या कामगिरीने सुशांतला इतकी प्रेरणा मिळाली की, शारीरिकदृष्ट्या ठिक नसतानाही त्याने पुढे जाऊन स्वत:चं नाव कमावलं आणि मार्गात अडथळे येवू दिले नाहीत…
पण मुरलीकांत पेटकर यांच्या बायोपिकमध्ये झळकण्याचं अभिनेत्याने स्वप्न पूर्ण होवू शकलं नाही. आता सुशांतने पाहिलेलं स्वप्न अभिनेता कार्तिक आर्यन पूर्ण करणार आहे. सध्या मुरलीकांत पेटकर यांच्या बायोपिकबद्दल मोठी माहिती समोर येत आहे.
नुकताच, कार्तिक आर्यन यांने दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. कार्तिक याच्या आगामी सिनेमाचं नाव ‘चंदू चँपियन’ आहे. सिनेमात कार्तिक एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. मुरलीकांत पेटकर हे भारताचे पहिले पॅरालंपिक सुवर्णपदक विजेते आहेत. ‘चंदू चँपियन’ सिनेमा मुरलीकांत पेटकर यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.
कार्तिक आर्यन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. सिनेमात कार्तिक याच्यासोबत अभिनेत्री किआरा अडवाणी हिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याआधी कार्तिकच्या ‘भुल भुलैय्या २’ सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमा केला.
सोशल मीडियावर देखील कार्तिक कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहते कायम अभिनेत्याच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.