Selfiee | ‘सेल्फी’ फ्लॉप झाल्याने करण जोहरवर भडकला अभिनेता; म्हणाला “मुकेश अंबानीचं कर्ज फेडण्यासाठी..”
सेल्फी हा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या कॉमेडी ड्रामाची निर्मिती करण जोहरने केली आहे. या चित्रपटात अक्षयने एका सुपरस्टारची भूमिका साकारली आहे.
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांचा ‘सेल्फी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. राज मेहता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट पाहिलेले प्रेक्षक सोशल मीडियावरही नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. अशातच एका अभिनेत्याने सेल्फी चित्रपटावरून निर्माता करण जोहरवर निशाणा साधला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर. खान ऊर्फ केआरके आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी तो नेहमीच ट्विट करून चर्चेत असतो.
केआरकेला अनेकदा त्याच्या ट्विट्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता पुन्हा एकदा त्याने अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या ‘सेल्फी’ चित्रपटावरून करण जोहरवर निशाणा साधला आहे. इतकंच नव्हे तर त्याने करणला देश सोडून पळून जाण्याचा सल्ला दिला आहे.
कमाल राशिद खानने ट्विट करत लिहिलं की ”सेल्फी’चा लाइफटाइम कलेक्शन हा 12 कोटी रुपये इतकं असेल. याचा अर्थ करण जोहरला पाच कोटी रुपयांचा शेअर मिळेल. त्याच्या ऑफिसच्या एका महिन्याच्या खर्चासाठी इतकी रक्कम पुरेशी आहे. मला असं वाटतं की करणने आता देश सोडून अमेरिकेला पळून जावं. नाहीतर त्याला मुकेश अंबानीचं कर्ज फेडण्यासाठी आपलं घर विकावं लागेल.’
केआरके इथेच थांबला नाही तर त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं, ‘करण जोहर – ही तीच व्यक्ती आहे, ज्याने सर्वांत आधी सुशांत सिंह राजपूतला त्रास दिला. त्याचा चित्रपट ड्राइव्ह हा थेट ओटीटीवर प्रदर्शित केला. सुशांतला हे आवडलं नव्हतं. सुशांतच्या निधनानंतर करणचे चित्रपट फ्लॉप होत आहेत.’
Film #Selfiee will do max lifetime business ₹12Cr! Means Karan Johar will get share of ₹5Cr! This is enough to bear his office expenses for one month. I believe Karan should run away to USA. Otherwise he has to sell his house to pay back loan of Mukesh Ambani.
— KRK (@kamaalrkhan) February 26, 2023
सेल्फी हा ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या कॉमेडी ड्रामाची निर्मिती करण जोहरने केली आहे. या चित्रपटात अक्षयने एका सुपरस्टारची भूमिका साकारली आहे. या सुपरस्टारसोबत एक सेल्फी क्लिक करण्याची विनंती त्याचा चाहता करतो, मात्र त्यादरम्यान असं काही घडतं, ज्यामुळे सगळा गोंधळ उडतो. यात नंतर मीडियासुद्धा सहभागी होते आणि हा लढा एक सुपरस्टार विरुद्ध चाहता असा होतो.
गेल्या वर्षांत अक्षयचे पाच चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र यापैकी एकाही चित्रपटाने विशेष कमाई केली नाही. रक्षा बंधन, राम सेतू, बच्चन पांडे आणि सम्राट पृथ्वीराज हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. तर कटपुतली हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.