Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे नाना पाटेकर आणि मनीषा यांची ‘अधुरी प्रेम कहाणी’, नात्याचा अंत अत्यंत वाईट

नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला आज असते पती - पत्नी! प्रसिद्ध अभिनेत्रीने नाना यांच्या आयुष्यात घेतली एन्ट्री आणि एका 'प्रेम काहणी'चा झाला अत्यंत वाईट अंत

प्रसिद्ध अभिनेत्रीमुळे नाना पाटेकर आणि मनीषा यांची 'अधुरी प्रेम कहाणी', नात्याचा अंत अत्यंत वाईट
Follow us
| Updated on: Jun 14, 2023 | 10:38 AM

मुंबई | अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी कायम त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही नाना यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नाना पाटेकर यांनी एकपेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. क्रांतिवीर, तिरंगा, यशवंत, वेलकम, अब तक छप्पन यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून नाना यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. नाना पाटेकर फक्त त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत राहीले होते. इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना नाना पाटेकर यांचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. पण कोणत्याही अभिनेत्रीसोबत त्यांचं नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. महत्त्वाचं म्हणजे नाना पाटेकर आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मनिषा कोइराला (Manisha Koirala) हिच्यासोबत देखील त्यांच्या नात्याची चर्चा तुफान रंगली…

नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी चाहत्यांना माहिती आहे. रिपोर्टनुसार, १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्निसाक्षी’ सिनेमातून दोघांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. पण दोघांचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. ‘अग्निसाक्षी’ सिनेमानंतर नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांनी १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खामोशी’ सिनेमात देखील दोघांनी पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर केलं..

‘खामोशी’ सिनेमात नाना पाटेकर यांनी मनिषाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. सिनेमा प्रदर्शित झाला आणि दोघांच्या अफेअरची चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली.. चाहत्यांमध्ये देखील दोघांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. शिवाय नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांच्या लग्नाची चर्चा देखील रंगू लागली..

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचं मनिषी कोईराला हिच्या घरी येणं – जातं देखील मोठ्या प्रमाणात वाढलं होतं… पण सगंळ काही चांगलं सुरु असताना असं काय झालं, ज्यामुळे नाना पाटेकर आणि मनिषा कोईराला यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नाना पाटेकर यांनी मनीषाची प्रेमात फसवणूक केल्याचं अनेकदा समोर आलं. मनीषा कोईरालाने नाना पाटेकर यांना अभिनेत्री आयशा झुल्कासोबत रंगेहाथ पकडलं होतं. या घटनेनंतर दोघांचं ब्रेकअप झाल्याचे सांगितलं जातं.

अभिनेत्री मनिषा हिचं नाव देखील अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. १२ सेलिब्रिटींसोबत अभिनेत्री नाव जोडण्यात आलं. पण अभिनेत्री नेपाळचे उद्योगपती सम्राट दहालसोबत केलं. १९ जून २०१० साली त्यांनी लग्न केलं. त्यानंतर २ वर्षांनंतर २०१२ रोजी दोघे विभक्त झाले. लग्नाच्या सहा महिन्यानंतर दोघांच्या नात्यात वादाची ठिणगी पेटू लागली..

खासगी आयुष्यात अनेक चढ उतार आल्यानंतर अभिनेत्रीने एका मुलाखतीत ‘माझ्या आयुष्यात पुरुषांचं प्रेम नाही..’ असं वक्तव्य केलं. आज पैसा, प्रसिद्धी संपत्ती सर्वकाही असूनही अभिनेत्री एकटं आयुष्य जगते. मनिषा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे..

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.