तुम्हालाही माहिती नसेल नाना पाटेकर यांचं खरं नाव? त्यांच्या कुटुंबापासून शिक्षणापर्यंत घ्या जाणून
Nana Patekar Real Name and Family: नाना पाटेकर यांचं खरं नाव तुम्हाला देखील नसेल माहिती..., जाणून घ्या नाना पाटेकर यांच्या कुटुंबापासून ते शिक्षणापर्यंत... दोन मुलांपैकी एकाचा मृत्यू...
Nana Patekar Real Name and Family: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. नाना फक्त त्यांच्या सिनेमांमुळे नाही तर, परखड वक्तव्यांमुळे देखील चर्चेत असतात. नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण त्यांचं खरं नाव मात्र फार कोणाला माहिती नसेल.
नाना पाटेकर यांच्या फार कमी चाहत्यांना त्यांचं खरं नाव, शिक्षण आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माहिती आहे. तर आज नाना पाटेकर यांच्या कुटुंबाबद्दल आणि त्यांचं खरं नाव काय आहे? जाणून घेऊ… नाना पाटेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
नाना पाटेकर यांचं खरं नाव?
नाना पाटेकर यांचा जन्म मराठी कुटुंबात झाला. महाराष्ट्रातील रायगड याठिकाणी नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 मध्ये झाला. मराठी कुटुंबात जन्म झालेल्या नाना पाटेकर यांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर असं आहे… त्यांचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती आहे.
नाना पाटेकर याचं कुटुंब
नाना पाटेकर हे व्यापारी कुटुंबातील होते. त्यांच्या वडिलांचे नाव गजानंद पाटेकर होते. त्यांची आई निर्मला पाटेकर गृहिणी होत्या. नाना पाटेकर यांना अशोक आणि दिलीप पाटेकर असे दोन भाऊ आहेत. नीलकंती पाटेकर त्यांच्या पत्नी. त्या बँक अधिकारी होत्या. तर नाना पाटेकर यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या एका मुलाचं निधन झालं आहे.
नाना पाटेकर शिक्षण
नाना पाटेकर यांनी मुंबईत राहून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांच्या शाळेचं नाव समर्थ विद्यालय असं होतं. शिलेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वांद्रे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेतले. ज्याचं नाव आता एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्ट असं आहे. सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी पदवीधर आहेत.
नाना पाटेकर यांचं फिल्मी करियर
1978 मध्ये नाना पाटेकर यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘गमन’ असं आहे. पहिल्या सिनेमानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. नाना पाटेकर यांना 3 राष्ट्रीय पुरस्कार, 2 फिल्मफेअर पुरस्कार आणि त्यांना 2013 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. याशिवाय त्यांना अनेक सन्मानही मिळाले आहेत.