Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tu Jhoothi Main Makkar सिनेमासाठी रणबीर कपूरने एकही रुपया घेतला नाही, कारण…

एका जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये घेणाऱ्या अभिनेता रणबीर कपूर याने Tu Jhoothi Main Makkar सिनेमात एकही रुपये न घेता केलं काम; आज सिनेमा करतोय कोट्यवधींची कमाई...

Tu Jhoothi Main Makkar सिनेमासाठी रणबीर कपूरने एकही रुपया घेतला नाही, कारण...
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 10:08 AM

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ (Tu Jhoothi Main Makkar) सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमानंतर सर्वत्र ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाची चर्चा आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाला चाहते आणि विश्लेषकांकडून देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ८ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमातील श्रद्धा आणि रणबीर यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. सिनेमाचं दिग्दर्शक लव रंजन यांनी केलं आहे. आज सिनेमा कोट्यवधींची कमाई करताना दिसत आहे. पण सिनेमात मुख्य भूमिकेत दिसलेल्या रणबीर याने एकही रुपये न घेता काम केल्याचा खुलासा खुद्द लव रंजन यांनी केला आहे.

‘तू झूठी मैं मक्कार’ सिनेमाबद्दल लव रंजन म्हणाले, ‘रणबीर याने सिनेमात काम करण्यासाठी माझ्याकडून आतापर्यंत कधीही पैसे घेतलेले नाहीत. अनेकदा आपल्याला समोरच्याला सांगावं लागतं मला या गोष्टीची गरज आहे. पण गेल्या ४ वर्षांपासून रणबीर याने मला कधीही निराज केलं नाही..’

एवढंच नाही तर यावेळी रणबीरने देखील लव रंजन यांचं कौतुक केलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘सिनेमा साकारण्यासाठी लव रंजन यांनी कोण्यात्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं नाही. हा सिनेमा साकारण्यासाठी त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य पणाला लावलं आहे. त्यामुळे मी त्यांचा आदर करतो. मी माझ्या आजोबांना असं काम करताना पाहिलं आहे.’

रणबीर पुढे म्हणाला, ‘मी माझ्या आजोबांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. सिनेमा साकारण्यासाठी त्यांनी अनेकदा आजीचे दागिने गहान ठेवले आहेत आणि अनेक गोष्टींचा त्याग करून स्वतःचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचा मी सन्मान करतो..’ असं देखील अभिनेता रणबीर कपूर म्हणाला आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि अभनेत्री श्रद्धा कपूर स्टारर ‘तू झूठी मैं मक्कार’ बॉक्स ऑफिसवर समाधान कारक कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाने आतापर्यंत ७६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सिनेमा किती रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत डिंपल कपाडिया, बोनी कपूर, हसलीन कौर, राजेस जैस, आयशा राजा मिश्रा या सेलिब्रिटींची देखील महत्त्वाची भूमिका आहे. ‘तू झूठी, मैं मक्कार’ सिनेमानंतर रणबीर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिच्यासोबत ‘एनिमल’ सिनेमात दिसणार आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.