सलमान खानच्या जीवाला धोका, वडिलांनी खर्च केले 1.32 कोटी, कारण…
Salman Khan father Salim Khan: सलमान खान याला सतत येत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या... भाईजानच्या वडिलांनी घेतला मोठा निर्णय खर्चे केले 1.32 कोटी रुपये, कारण..., गेल्या काही दिवसांपासून खान कुटुंब सतत आहे चर्चेत...
Salman Khan father Salim Khan: बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. अभिनेत्याला सतत जीवेमारण्याच्या धमक्या येत आहे. सलमान खान याचे जवळचे मित्र आणि ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी भाईजानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. अशात सतत येणाऱ्या धमक्यांदरम्यान सलमान खान याच्या सुरक्षेत देखील मोठी वाढ करण्यात आली आहे. याच दरम्यान सलीम खान यांनी देखील आलिशान कार खरेदी केली आहे.
सलमान खानचे वडील सलीम खान यांनाही बिश्नोई टोळीकडून अनेकदा धमक्या आल्या आहेत. गेल्या वर्षी एकदा सलीम खान उद्यानात मॉर्निंग वॉक करत असताना त्यांना धमकीचं पत्र सापडलं. सध्या खान कुटुंब सतत येणाऱ्या धमक्यांमुळे चर्चेत आहे.
दरम्यान, सलीम खान यांनी Mercedes Benz GLS कार खरेदी काली आहे. पांढऱ्या रंगाची आलिशान कार सलमान खान याच्या वांद्र येथील घराबाहेर उभी आहे. Mercedes Benz GLS कार किंमत 1.32 असल्याचं सांगण्यात येत आहे. कार घरी आल्यानंतर सलीन खान यांनी नव्या कारची पूजा देखील केली.
View this post on Instagram
काही महिन्यांपूर्वी सलमान खानला टार्गेट करत बिष्णोई गगँने वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता. याप्रकरणी आरोपींना अटकही करण्यात आली आहे. काळवीट शिकार प्रकरणी गँगस्टर बिश्नोई सलमान खानला माफी मागण्यास सांगत आहे.
अनेक प्रसंगी आपल्या वक्तव्यात लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान याला माफी मागावी लागेल अन्यथा त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल. पण सलमान खानने कोणतीही शिकार केलेली नाही, मग त्याने माफी का मागावी, असं वक्तव्य सलीम खान यांनी केलं होतं.
सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘सिंघम अगेन’ सिनेमात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सलमानचा ‘सिकंदर’ सिनेमा देखील प्रदर्शित होत आहे. ‘सिकंदर’ सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.