सलमान खान याच्या घरातील ‘हा’ सदस्य चक्क उभे राहूनच झोपतो, मोठा खुलासा, कोणाचीही हिंमत…
अभिनेता सलमान खान याने एक अत्यंत मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सलमानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खानच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आलीये.
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतात. सलमान खान सोशल मीडियावरही सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी सलमानचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही सलमान खान दिसला. सलमान खान हा फक्त त्याच्या अभिनयामुळेच नाही तर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतो. सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिलच्या पहाटे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी आरोपींना अटक केली.
हेच नाही तर आता सलमान खान याच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आलीये. सलीम खान यांनी त्यांच्या घरातील एका सदस्याबद्दल मोठा खुलासा केला. सलमान खानचे वडील सलीम खान, सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान हे काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा याच्या शोमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्याकडून अत्यंत मोठा खुलासा करण्यात आला.
सलीम खान म्हणाले की, सलमा हिने हुंड्यामध्ये गंगारामला आणले आहे. विशेष म्हणजे घरातील कोणीही व्यक्ती गंगारामला रागू शकल नाही. सर्वजण गंगारामला मामा बोलतात. एकदा मी गंगारामला थोडासा ओरडलो होतो तर माझी पत्नी सलमा ही मला चक्क सहा महिने अजिबात बोलली नव्हती. यावर कपिल याने विचारले की, तो कुठलचा आहे?.
सलीम खान म्हणाले की, ते मला ही माहिती नाहीये…तो सलमा हिच्यासोबत लग्नात आला आणि तो गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहतो. पुढे सलीम खान म्हणाले की, तो कधीही आणि कुठेही झोपतो. फक्त त्याला डोके टेकवण्यासाठी एखादी भिंत मिळाली तरीही तो उभे राहूनच झोपू शकतो. अरबाज म्हणाला की, तो काहीही बोलू शकतो.
एकदा मी घरी फोन केला आहे म्हटले की, डॅडी कुठे आहेत? तर गंगाराम मला म्हणतो की, कोण डॅडी? मी परत म्हटले की, डॅडी…तर तो मला म्हणतो की, तुझा बाप झोपला आहे. अरबाज म्हणाला की, तो कोणालाही काहीही बोलू शकतो. विशेष म्हणजे यावेळी कपिल शर्माच्या शोमध्ये गंगाराम हा देखील पोहोचला होता. कपिल शर्माने गंगारामला स्टेजवर बोलावले होते.