Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाली बेंद्रेपासून सैफ अली खान-सलमान खान यांच्या महत्वाच्या केस लढणारे ‘स्टार’ वकील श्रीकांत शिवडे यांचं निधन

मुंबई : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांचे वकिल राहिलेले वकील श्रीकांत शिवडे (adv Shrikant Shivade) यांचं निधन झालंय. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून ते ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. काल( बुधवार) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक बॉलिवुड अभिनेत्यांच्या केस त्यांनी कोर्टात लढवल्या आहेत. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक केला आहे. सेलिब्रिटींचे वकील अॅड. […]

सोनाली बेंद्रेपासून सैफ अली खान-सलमान खान यांच्या महत्वाच्या केस लढणारे 'स्टार' वकील श्रीकांत शिवडे यांचं निधन
श्रीकांत शिवडे, सलमान खान,
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 12:50 PM

मुंबई : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांचे वकिल राहिलेले वकील श्रीकांत शिवडे (adv Shrikant Shivade) यांचं निधन झालंय. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून ते ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. काल( बुधवार) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक बॉलिवुड अभिनेत्यांच्या केस त्यांनी कोर्टात लढवल्या आहेत. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक केला आहे.

सेलिब्रिटींचे वकील

अॅड. श्रीकांत शिवडे यांनी अनेक सेलिब्रिटींच्या केस कोर्टात लढवल्या. बॉलिवूडचा दबंग सलमान खानची हिट अँण्ड रन केसही श्रीकांत शिवडे यांनी लढली होती. तसंच सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्या शिकार प्रकरणीही श्रीकांत शिवडे यांनी या सेलिब्रिटींची बाजू कोर्टात मांडली होती.

हाय प्रोफाईल केस लढणारे विधिज्ञ

हाय प्रोफाईल केस लढणं आणि त्या जिंकणं हा अॅड. श्रीकांत शिवडे यांची खासियत होती. शाईनी अहुजा, 2 जी स्पेकट्रम या केसेस देखील श्रीकांत यांनी लढल्या होत्या. डायमंड बिझनेसमन भरत शाह यांची केसदेखील शिवडे यांनी लढली होती. त्याचबरोबर सलमान खानच्या हिट अँण्ड रन प्रकरणात त्यांनी सलमानची बाजू ठामपणे मांडली त्यामुळे सलमानला क्लिनचिटदेखील मिळाली.

मागच्याच वर्षी त्यांचं बोन मॅरो ट्रांसप्लांट झालं होतं. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीकांत शिवडे यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी. मुलगी आणि मुलगा आहेत.

संबंधित बातम्या

Kannada Filmmaker Pradeep Raj Passed Away : कन्नाड चित्रपट निर्माते प्रदीप राज यांचं निधन, कोरोना संसर्ग झाला असल्याची माहिती

प्रेमळ बायको, खडूस बॉस!, ‘रोज नवी ठिणगी वादाची-‘बॉस माझी लाडाची’, नवी कथा-नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Dhanush Aishwarya Divorce | मुलीचं लग्न वाचवण्यासाठी बापाचे प्रयत्न? धनुष टाळत होता रजनिकांतची भेट?

वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी
'तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?,'शिरसाट आणि आव्हाडांमध्ये खडाजंगी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी
संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? इनसाईड स्टोरी.
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पवारच आता दादांसोबत जातील... बच्चू कडूंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण.