मुंबई : बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांचे वकिल राहिलेले वकील श्रीकांत शिवडे (adv Shrikant Shivade) यांचं निधन झालंय. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागच्या काही दिवसांपासून ते ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. काल( बुधवार) त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक बॉलिवुड अभिनेत्यांच्या केस त्यांनी कोर्टात लढवल्या आहेत. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक केला आहे.
सेलिब्रिटींचे वकील
अॅड. श्रीकांत शिवडे यांनी अनेक सेलिब्रिटींच्या केस कोर्टात लढवल्या. बॉलिवूडचा दबंग सलमान खानची हिट अँण्ड रन केसही श्रीकांत शिवडे यांनी लढली होती. तसंच सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्या शिकार प्रकरणीही श्रीकांत शिवडे यांनी या सेलिब्रिटींची बाजू कोर्टात मांडली होती.
हाय प्रोफाईल केस लढणारे विधिज्ञ
हाय प्रोफाईल केस लढणं आणि त्या जिंकणं हा अॅड. श्रीकांत शिवडे यांची खासियत होती. शाईनी अहुजा, 2 जी स्पेकट्रम या केसेस देखील श्रीकांत यांनी लढल्या होत्या. डायमंड बिझनेसमन भरत शाह यांची केसदेखील शिवडे यांनी लढली होती. त्याचबरोबर सलमान खानच्या हिट अँण्ड रन प्रकरणात त्यांनी सलमानची बाजू ठामपणे मांडली त्यामुळे सलमानला क्लिनचिटदेखील मिळाली.
मागच्याच वर्षी त्यांचं बोन मॅरो ट्रांसप्लांट झालं होतं. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीकांत शिवडे यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी. मुलगी आणि मुलगा आहेत.
संबंधित बातम्या