सलमान खानने कडक सुरक्षेत सुरु केलं मोठं काम, ‘संपूर्ण भागात कोणालाच…’, सूत्रांची माहिती
Salman Khan: सलमान खान याच्या जीवाला धोका, तरीही कडक सुरक्षेत भाईजानने सुरु केलंय मोठं काम, 'पूर्ण भागात कोणालाच...', सूत्रांची माहिती, सध्या सर्वत्र फक्त सलमान खान आणि त्याला मिळालेल्या धमकीची चर्चा...
Salman Khan: ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबार आणि हत्या प्रकरणानंतर सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याने ‘बिग बॉस शो 18’ शोचं शुटिंग देखील रद्द केलं. सलमान खान आता शोचं शुटिंग करणार नाही… अशी देखील माहिती समोर आली. पण आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान याने कडक सुरक्षेत ‘बिग बॉस’ शोसाठी शुटिंग सुरु केलं आहे. शुटसाठी येणाऱ्या प्रत्येकाचे ओळखपत्र तपासले जात आहेत. संपूर्ण परिसरात कोणालाच थांबण्याची परवानगी नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान, शुक्रवारी ‘विकेंड का वार’ शूट करणार आहे. ज्यासाठी अभिनेत्याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पण काही दिवसांपूर्वी अभिनेता शोचं शुटिंग करणार नसल्याची माहिती समोर आली होती. सलमान खान याच्या जागी कोरिओग्राफर फरहा खान शोच्या होस्टची भूमिका पार पाडणार होती. पण आता खुद्द सलमान खान शो होस्ट करणार आहे.
सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी
याआधी देखील गुंड लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी केली आहे. आता पुन्हा सर्व वाद मिटवण्यासाठी बिश्नोई टोळीने सलमान खान याला धमकी केली आहे. सर्व वाद संपवण्यासाठी सलमान खान याच्याकडे तब्बल 5 कोटी रुपयांची मागणी केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला 5 कोटी रुपये देण्याची मागणी करणारा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला आहे. धमकी देणारा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. जर पैसे दिले नाहीत तर सलमान खानचे नशीब माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा वाईट होईल…. अशी धमकी अभिनेत्याला देण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्या
ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकारली आहे. फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत लॉरेन्स बिश्नोई याने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. जर कोणी सलमान खान आणि दाऊद इब्राहिम याला मदत करण्याचा प्रयत्न केला तर, त्याने स्वतःचा हिशोब करून ठेवायचा… असं पोस्ट मध्ये लिहिण्यात आलं होत. धक्कादायक घटनेनंतर सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.