बॉलिवूड अभिनेता सलमान खान हा सध्या दु:खात आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. हैराण करणारे म्हणजे ही हत्या लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीकडून करण्यात आलीये. लॉरेन्स बिश्नोई याच्याकडूनच सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. हेच नाही तर आपण स्वत:ला गॅंगस्टर अजून मानत नाहीत, ज्यादिवशी सलमान खान याची हत्या आपल्या टोळीकडून केली जाईल, त्याचदिवशी आपण स्वत:ला गॅंगस्टर म्हणणार असल्याचे लॉरेन्स बिश्नोई यांच्याकडून काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये सांगण्यात आले.
सलमान खान हा बाबा सिद्दीकी यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी सलमान खान याचा चेहरा बरेच काही सांगून गेला. बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून एक पोस्ट ही सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. सलमान खान आणि दाऊद इब्राहिमच्या जवळचे असल्यानेच आपण बाबा सिद्दीकीची हत्या केल्याचे त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले.
आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याच्याही सुरक्षेत अत्यंत मोठी वाढ ही करण्यात आलीये. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसह पनवेल फार्म हाऊसची सुरक्षा वाढवली आहे. सलमान खानचे फार्म हाऊस नवी मुंबईच्या पनवेलमध्ये आहे. सलमान खानच्या फार्म हाऊसकडे जाण्यासाठी एकच गावचा रस्ता आहे.
पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्क केले आहे. कोणीही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास लगेचच पोलिसांना सांगण्यास सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे या कामात स्थानिक ग्रामस्थ हे पोलिसांची मदत करत आहेत. हेच नाही तर पोलिसांकडून सलमान खानच्या फार्म हाऊसची सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणात वाढवलीये. फार्म हाऊसच्या बाहेर आणि आतमध्ये पोलिसांचा मोठा पारा आहे.
काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीतील सदस्यांनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसची रेकी केली होती. बाबा सिद्दीकी याच्या निधनानंतर सलमान खानला अत्यंत मोठा धक्का बसलाय. 14 एप्रिलच्या पहाटे सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. हेच नाही तर ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता.