मुंबई : संजय दत्तने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे संजय दत्त (Sanjay Dutt) याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. काही दिवसांपूर्वीच संजय दत्त मुंबईच्या विमानतळावर स्पाॅट झाला होता. यावेळी खास लूकमध्ये संजय दत्त दिसला. सध्या संजय दत्त विदेशात असून चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आता संजय दत्त हेरा फेरी 3 (Hera Pheri 3) चित्रपटात धमाका करताना दिसणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. हेरा फेरी 3 चित्रपटाला अगोदर अक्षय कुमार (Akshay Kumar) याने नकार दिला होता. मात्र, सर्वांनाच मोठा धक्का देत अचानक अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 ला होकार दिला.
हेरा फेरी 3 चित्रपटाला अक्षय कुमार याने नकार दिल्याने चित्रपट निर्माते हे कार्तिक आर्यन याच्या संपर्कात होते. मात्र, शेवटी अक्षय याने चित्रपटाला होकार दिला. हेरा फेरी 3 चित्रपटात संजय दत्त दिसणार असल्याने चाहत्यांमध्येही कमालीचा उत्साह बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा प्रोमो शूट करण्यात आलाय.
नुकताच आता संजय दत्त याच्याबद्दलची मोठी अपडेट पुढे येत आहे. हेरा फेरी 3 सोबतच एका धमाकेदार चित्रपटात धमाका करताना संजय दत्त हा दिसणार आहे. संजय दत्त याला एका मोठ्या चित्रपटाची आॅफर आल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन करताना संजय दत्त हा दिसणार आहे.
पॅन इंडिया चित्रपटात आता संजय दत्त याचे आगमन झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची शूटिंग 2024 मध्ये केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याच्या शमशेरामध्ये संजय दत्त हा दिसला होता. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला.
पॅन इंडिया चित्रपटात अभिनेत्यासोबत जोरदार अॅक्शन करताना संजय दत्त हा दिसणार आहे. विशेष म्हणजे निर्माते हे लवकरच या चित्रपटाची घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहेत. हा चित्रपट पुढच्याच वर्षी रिलीज होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. आता या चित्रपटाबद्दल संजय दत्त याच्या चाहत्यांना देखील आतुरताना लागली आहे.