शाहरुख खानच्या लेकीचा मोबाईल नंबर लिक, कुणी केली काडी?; सुहाना हिचा फोन…
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. शाहरुख खानची लेक सुहाना खान हिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. मात्र, तिच्या पहिल्या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. सुहाना सोशल मीडियावरही सक्रिय असते.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अनन्या पांडेचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. मात्र, अनन्या पांडेच्या चित्रपटांना म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळत नाहीये. अनन्या पांडे ही गेल्या काही वर्षांपासून आदित्य रॉय कपूर याला डेट करत होती. मात्र, त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरदार रंगताना दिसल्या. यादरम्यानच थेट अनन्या पांडे आणि हार्दिक पांड्या यांचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यावरून चर्चा सुरू होती की, अनन्या पांडे ही हार्दिकला डेट करत आहे.
आता नुकताच अनन्या पांडे हिने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना अनन्या पांडे ही दिसली आहे. अनन्या पांडे आणि सुहाना खान या दोघी खूप जास्त चांगल्या मैत्रिणी आहेत. लहानपणापासून दोघी एकसोबत राहिल्या आहेत आणि आताही दोघी एकमेकींना सपोर्ट करताना दिसतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात.
अनन्या पांडे हिने मुलाखतीमध्ये म्हटले की, एकदा मी सुहानाला व्हिडीओ कॉल केले पण ती कॉलच रिसिव्ह करत नव्हती. मी त्याचा स्क्रीनशॉट काढला आणि थेट सोशल मीडियावर शेअर केला आणि मी तिला मिस करत असल्याचे लिहिले. मी जो स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला होता त्यावर तिचा नंबर दिसत होता.
मला सुहानाने कॉल करून सांगितले की, तिचा फोन हॅकही झालाय. त्यानंतर मी लगेचच तो फोटो डिलीट केला. माझ्यामुळे सुहानाचा नंबर लिक झाला आणि हेच नाही तर थेट तिचा फोनही हॅक झाला. पुढे अनन्या पांडे म्हणाली की, एकदा एक मुलाखत सुरू होती. त्यावेळी एका रिपोर्टरने मला माझा नंबर मागितला. कारण पुढच्यावेळी मुलाखतीसाठी.
मी त्या रिपोर्टरला माझा नंबर देखील दिला. मात्र, ज्यावेळी मी त्याला नंबर देत होते तेंव्हा मुलाखत सुरू होती. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि माझा नंबर लीक झाला. अनन्या पांडे ही कायमच मुलाखतीमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दलही मोठे खुलासे करताना दिसते. आता अनन्या पांडे ही नवीन मुलाखत चांगलीच चर्चेत आलीये.