Shah RuKh Khan इन्स्टाग्रामवर करतो फक्त 6 जणांना फॉलो; त्यामध्ये ‘ही’ तरुणी कोण?

Shah RuKh Khan | शाहरुख खान इन्स्टाग्रामवर कुटुंब, मॅनेजर आणि वकील यांच्यासोबतच 'या' तरुणीला करतो फॉलो, तरुणी नक्की आहे तरी कोण? सध्या सर्वत्र किंग खान याची चर्चा...

Shah RuKh Khan इन्स्टाग्रामवर करतो फक्त 6 जणांना फॉलो; त्यामध्ये 'ही' तरुणी कोण?
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 12:01 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : ‘कुछ कुछ होता है’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले’, ‘पठाण’, ‘रावण’ अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या अभिनेता शाहरुख खान याने बॉलिवूमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली आहे. किंग खान, बादशहा, पठाण, जवान… अशा नावांने देखील शाहरुख खान याला ओळखलं जातं. किंग खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नसून साता समुद्रापार देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील शाहरुख खान याला फॉलो करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम स्वतःचे फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

अभिनेत्याच्या पोस्टवर असंख्य चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. इन्स्टाग्रामवर शाहरुख याला फॉलो करणाऱ्यांची संख्या तब्बल ४०.६ मिलियन इतकी आहे. तर किंग खान फक्त ६ जणांना सोशल मीडियावर फॉलो करतो. शाहरुख खान अभिनेता सलमान खान, आमिर खान यांना फॉलो करत नसून पत्नी गौरी खान, मुलगा आर्यन खान, मुलगी सुहाना यांना फॉलो करतो..

कुटुंबासोबत शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानी हिने देखील फॉलो करतो. किंग खान वकील काजल आनंद यांना देखील फॉलो करतो. काजल आनंद प्रसिद्ध वकील असून त्यांनी अनेक सेलिब्रिटींना न्यायालयीन कामात मदत केली आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या सोशल मीडियाची चर्चा रंगत आहे.

शाहरुख खान इन्स्टाग्रामवर कुटुंब, मॅनेजर आणि वकील यांच्यासोबतच आलिया छिबा हिला देखील फॉलो करतो. आलिया छिबा ही गौरी खान हिचा भाऊ विक्रांत छिबा याची मुलगी आहे. आलिया हिला अनेकदा सुहाना खान हिच्यासोबत देखील स्पॉट करण्यात आलं आहे. सुहाना हिने अनेकदा आलिया हिच्यासोबत फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

शाहरुख कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शाहरुख स्टारर ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात शाहरुख याच्यासोबत विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि प्रियामणी यांच्या भूमिका आहेत. सिनेमात दीपिका पदुकोणचाही एक कॅमिओ आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.