बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीने सलमान खान आणि शाहरुख खानला फटकारले, म्हणाली, तुमच्यामुळे खराब….

बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये कायमच सलमान खान आणि शाहरुख खान यांची जोडी धमाका करताना दिसते. यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. शाहरुख खानचा देखील डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीने सलमान खान आणि शाहरुख खानला फटकारले, म्हणाली, तुमच्यामुळे खराब....
Salman Khan and shah rukh khan
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 7:44 PM

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खान यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे दोघांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या. शाहरुख खान आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड असे प्रेमही दिले. शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वी डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. 2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी लकी ठरले. 2018 नंतर शाहरुख खान हा बॉलिवूड चित्रपटांमध्ये परत एकदा धमाका करताना दिसला. दुसरीकडे सलमान खान याचेही चित्रपट धमाके करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला.

बिग बॉसच्या मंचावर काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान हा पोहोचला. यावेळी शाहरुख खान याने एक मोठा खुलासा केला. शाहरुख खान हा ‘करण अर्जुन’ चित्रपटाच्या सेटवरील किस्सा सांगताना दिसला. करण अर्जुन चित्रपटामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबतच ममता कुलकर्णी ही देखील मुख्य भूमिकेत होती.

चित्रपटात या तिघांचे एक गाणे होते. मात्र, या गाण्याच्या शूटिंगवेळी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्याकडून अनेक चूका होत होत्या. यामुळे सतत रिटेक घ्यावे लागत होते. शाहरुख खान म्हणाला की, गाण्याच्या शूटिंगनंतर मी आणि सलमान बसलो होतो. यावेळी ममता ही आमच्याकडे पाहून शिट्टी वाजवून बोलावताना दिसली.

मला आणि सलमानला वाटले की, ही आम्हाला असे नाही बोलावणार. मात्र, परत तिने शिट्टी वाजवत आमच्याकडेच हात केला. मग आम्ही दोघे ममताकडे गेलो. ती आम्हाला अगदी स्पष्टपणे सांगताना दिसली की, तुम्ही रिहर्सल करायला या कारण तुमच्या स्टेप्स अजिबात चांगल्या नाहीत. तुम्ही दोघेही खूप खराब करत आहात. 

ममता कुलकर्णीचे बोलणे ऐकून सलमान खान आणि शाहरुख खान यांनी तब्बल पहाटे पाच वाजेपर्यंत गाण्याची रिहर्सल केली. विशेष म्हणजे आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीचे ऐकून सलमान खान आणि शाहरुख खान यांनी पाचपर्यंत रिहर्सल केली. विशेष म्हणजे सलमान खान आणि शाहरुख खान यांचा करण अर्जुन हा चित्रपट सुपरहिट ठरला. 

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.