Shah Rukh khan | २२ वर्षांपूर्वी आर्यन खान याने केलीये वडिलांसोबत स्क्रिन शेअर; किंग खानच्या सिनेमातील ‘हा’ सीन नक्की पाहा

२२ वर्षांपूर्वी 'या' सिनेमात झळकला आर्यन खान; विश्वास बसत नसेल तर किंग खानच्या सिनेमातील एक सीन नक्की पाहा... तुम्हालाही आठवतील जुने क्षण

Shah Rukh khan | २२ वर्षांपूर्वी आर्यन खान याने केलीये वडिलांसोबत स्क्रिन शेअर; किंग खानच्या सिनेमातील 'हा' सीन नक्की पाहा
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 12:49 PM

मुंबई : 90 च्या दशकातील काळ हा तरुण पिढी कधीच विसरू शकत नाही. शाहरुख खान, सलमान खान, काजोल, जुही चावला… अशा एकापेक्षा एक कलाकारांमुळे ९० च्या दशकातील सिनेमे हिट ठरले आण आजही चाहते तितक्यात आवडीने ९० च्या दशकातील सिनेमे पाहतात. सिनेमांसह गाण्यांचा अनुभव देखील फार वेगळा होता. ९० च्या दशकात सिनेमांमध्ये बाल कलाकार म्हणून भूमिका साकारणारे कलाकार आता मोठे झाले आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शिवाय अनेक बाल कलाकारांनी बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिकेत पदार्पण केलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे २२ वर्षांपूर्वी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने देखील वडिलांसोबत स्क्रिन शेअर केली.

शाहरुख आणि आर्यन खान यांनी ज्या सिनेमात स्क्रिन शेअर केली, त्या सिनेमाचं नाव आहे ‘कभी खुशी कभी गम…’ २००१ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाने चाहत्यांचं मनोरंजन केलं. सिनेमात शाहरुख खान याने राहुल ही भूमिका साकारली होती. सिनेमात काही सेकंदांसाठी शाहरुख खान याचं बालपन दाखवण्यात आलं होतं. तेव्हा आर्यन खान याने सिनेमात लहान राहुलची भूमिका साकारली होती.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्या जया बच्चन यांच्यासोबत आर्यनचा फार लहान सीन होता. पण त्या लहान मुलाच्या स्माईलने चाहत्यांचं मनोरंजन केलं. तेव्हा देखील आर्यन खान याची चर्चा तुफान रंगली. सध्या सिनेमातील एक सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

लहानपणी ‘कभी खुशी कभी गम…’ सिनेमातच नाही तर आर्यन खान याने ‘लॉयन किंग’ सिनेमाला देखील स्वतःचा आवाज दिला आहे. आर्यनचा आवज ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाला, ‘हा आवाज तर शाहरुख खान याच्यासारखातच आहे….’ सध्या सर्वत्र आर्यन खान आणि शाहरुख खान याची चर्चा आहे.

‘कभी खुशी कभी गम…’ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमात अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी एकत्र स्क्रिन शेअर केली. अमिताभ बच्चन, जया बच्चन, हृतिक रोशन, काजोल आणि करीना कपूर यांनी देखील सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली. सिनेमा प्रसिद्ध कुटुंबावर आधारलेला होता.

आर्यन खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, किंग खान याचा मुलगा अभिनेता नसला तरी त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आर्यन हा दिग्दर्शक आणि लेखक म्हणून इंडस्ड्रीमध्ये स्वतःची ओळख तयार करणार आहे. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आर्यन खान याने स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. आर्यन खान याच्या क्लोदिंग ब्रॅन्डचं नाव D yavol.x असं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.