अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर काय केले उपचार, कशी आहे प्रकृती

Shreyas Talpade heart attack : प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे याला चित्रपटाचे शुटींग झाल्यानंतर ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. 'वेलकम 3' चित्रपटाच्या शुटींगनंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर तो खाली कोसळला होता. त्याच्यावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे याला ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर काय केले उपचार, कशी आहे प्रकृती
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 2:02 PM

रवी खरात, मुंबई, 15 डिसेंबर | मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील आपल्या दमदार भूमिकेमुळे अल्पवधीतच प्रसिद्ध झालेला अभिनेता श्रेयस तळपदे याला चित्रपटाचे शुटींग झाल्यानंतर ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या शुटींग संपून घरी गेल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटू लागले. तो जागीच कोसळला. त्याला त्याची पत्नी दिप्तीने तातडीने अंधेरीतील रुग्णालयात नेले. त्याला ह्रदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तातडीने अँजिओग्रॉफी केले. त्यात ह्रदयातील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळले. यामुळे डॉक्टरांनी लागलीच अँजिओप्लास्टी केली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्याच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून आहे.

शुटींग दरम्यान हास्यविनोद

श्रेयस ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाची गुरुवारी अभिनेता अक्षय कुमारसोबत शुटींग करत होता. यावेळी त्याने अनेक लहान-मोठे सिन्स केले. सेटवर त्याची प्रकृती चांगली होती. तो हास्य विनोद करत असल्याचे सेटवरील सहकाऱ्यांनी सांगितले. परंतु घरी आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 47 वर्षीय श्रेयस याला अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्याच्यावर गुरुवारी रात्री दहा वाजता अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याची प्रकृती सुधारत आहे.

‘इकबाल’ चित्रपटामुळे मिळाली ओळख

श्रेयस तळपडे याला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. सुनील गावस्कर आणि कपिल देव त्याचे आवडते खेळाडू आहेत. टीव्ही पाहणे आणि भटकंती करण्याची त्याला आवड होती. लहानपणापासून त्याला बॉलीवूडचे आकर्षण होते. अमिताभ बच्चन आणि कॅटरिना कॅफ त्याचे आवडते कलाकार आहे. श्रेयसचे शिक्षण श्रीराम सोयायटी वेलफेरअ हायस्कूलमध्ये झाले. शिक्षणात त्याची प्रगती चांगली होती. शाळेत नाटकांमध्ये त्याने अनेक भूमिका केल्या. मराठी रंगभूमीवर आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर ‘इकबाल’ (2005) चित्रपटानंतर श्रेयस देशभर ओळखला जाऊ लागला. ‘डोर’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘वेलकम टू सज्जनपुर’ आणि ‘गोलमाल रिटर्न्स’ सह ४० पेक्षा जास्त मराठी, हिंदी चित्रपटात त्याने काम केले.

हे सुद्धा वाचा
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.