ज्या हॉटेलमध्ये वडील करायचे सफाई, त्याच जागेचा अभिनेत्याला मिळला मालकी हक्क
वडिलांना प्रेरणास्थानी ठेवून अभिनेत्याने अनेक संकटांवर मात... ज्या हॉटेलमध्ये वडील काम करायचे, त्याच जागेचा मालकी हक्क मिळवून अभिनेता करतो कोट्यवधींची कमाई
मुंबई | 12 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अनेक संकटांचा सामना करत इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलं. आता काही अभिनेते अभिनय क्षेत्रात सक्रिय नसले तरी, त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. सध्या चर्चा रंगत अभिनेता सुनिल शेट्टी यांची.. एक काळ होता जेव्हा सुनिल शेट्टी यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. इंडस्ट्रीमध्ये सुनिल शेट्टी यांची अण्णा म्हणून देखील ओळख आहे. सुनिल शेट्टी यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण वडिलांना प्रेरणास्थानी ठेवून अभिनेत्याने अनेक संकटांवर मात केली.
सुनिल शेट्टी त्यांच्या वडिलांना खरे हिरो मानतात. सुनिल शेट्टी आज स्टार असले तरी, अनेकदा अभिनेत्याने मुलाखतींमध्ये वडिलांच्या संघर्षाबद्दल सांगितलं आहे. सुनिल शेट्टी यांनी सांगितलं की, अभिनेत्याच्या वडिलांनी वयाच्या ९ व्या वर्षी एका हॉटेलमध्ये सफाई करण्याची नोकरी सुरु केली. त्यानंतर ते काउंटरवर बसू लागले. सुनिल शेट्टी वडिलांनी वेटरचं देखील काम केलं..
छोटी सुरुवात केल्यानंतर अभिनेत्याच्या वडिलांनी १९४३ मध्ये हॉटेलची पूर्ण इमारत खरेदी केली.. ज्यामुळे सुनिल शेट्टी यांचा हॉटेलचा व्यवसाय आज जगप्रसिद्ध आहे. ‘माझे वडील कोणतेही काम पूर्ण मन लावून करायचे. कोणतेही काम करण्यासाठी त्यांना लाज वाटली नाही.. माझ्या वडिलांनी मला देखील हिच शिकवण दिली आहे..’ असं देखील सुनिल शेट्टी म्हणाले.
सुनिल शेट्टी यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत सुनिल शेट्टी यांनी दोन सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण दोन्ही सिनेमे चित्रपटगृहात प्रदर्शित झाले नाही. याबद्दल देखील अभिनेत्याने एका मुलाखतीत खंत व्यक्त केली होती.
सुनिल शेट्टी म्हणाले, ‘ऐश्वर्या राय हिच्यासोबत काम करण्याची प्रत्येक अभिनेत्याने इच्छा असते. मी ऐश्वर्या सोबत काम केलं पण सिनेमे प्रदर्शित झाले नाहीत.. याचं मला दुःख होतं. कदाचित ते माझं दुर्भाग्य असेल…’ सुनिल शेट्टी आणि ऐश्वर्या राय यांनी ‘हम पंछी एक डाल के’ आणि ‘राधेश्याम सीताराम’ या दोन सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली होती.
सुनिल शेट्टी आता मोठ्या पडद्यावर अधिक सक्रिय नसले तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर सुनिल शेट्टी यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अभिनेत्याच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.