मुलीला पकडलं, किस केल आणि फेकून…, सनी देओल यांचं मोठं विधान
Sunny Deol on Kissing scenes : सिनेमात दिलेल्या 'त्या' किसिंग सीनवर सनी देओल यांचं मोठं विधान... अनेक अभिनेत्रींसोबत सनी देओल यांनी स्क्रिन शेअर केली आहे. सर्वत्र सनी देओल यांच्या वक्तव्याची चर्चा
मुंबई | 19 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सनी देओल यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. सनी देओल यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. ‘गदर’ सिनेमानंतर सनी देओल यांच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. पण एक काळ असा होता जेव्हा सनी देओल किसिंग सीनमुळे चर्चेत आले होते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी देओल यांची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, सनी देओल यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया, अमृता सिंग यांच्यासोबत देखील किसिंग सीन शूट केले आहेत. सनी देओल यांनी एकदा एका अभिनेत्रीसोबत दिलेल्या किसिंग सीनवर मोठं वक्तव्य केलं होतं. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
‘द कपिल शर्मा’ शोमध्ये सनी देओल आले होते. तेव्हा ‘बेताब’ सिनेमात अमृता सिंग आणि सनी देओल यांच्या किसिंग सीनवर वाद निर्माण झाले होते. सनी म्हणाले होते, ‘रोमान्स कधीही लाजत केला जातो. रोमान्समध्ये लाजणं नसेल तर, तो रोमान्स राहत नाही. ‘बेताब’ सिनेमात मी लाजलो नाही मुलीला पकडलं, किस करुन फेकून दिलं…’
एवढंच नाही तर, सनी देओल यांच्यासबोत दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींनी काम करण्यास नकार दिला. पण ‘चालबाज’ सिनेमात सनी देओल आणि श्रीदेवी यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं.
सनी देओल गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ‘गदर’ आणि ‘गदर 2’ सिनेमात साकारलेल्या तारा सिंग या भूमिकेनंतर चाहत्यांनी सनी देओल यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.
‘गदर 2’ सिनेमाने देखील चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. ‘गदर’ सिनेमानंतर अनेक वर्षांनंतर ‘गदर 2’ सिनेमा चाहत्यांच्या भेटीस आला. ज्यामुळे सनी देओल यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने अनेक रेकॉर्ड मोडले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी देओल यांची चर्चा रंगली आहे.