Sunny Deol | ‘गदर 2’च्या जबरदस्त कामगिरीनंतर सनी देओल याने व्यक्त केली चक्क ‘ही’ मोठी इच्छा, थेट म्हणाला, या अभिनेत्रीसोबत मला
गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले असून हा चित्रपट अजूनही बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. सनी देओल याचे या चित्रपटासाठी काैतुक केले जात आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळत आहे. गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट तब्बल 22 वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठे क्रेझ बघायला मिळत आहे. मुळात म्हणजे सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा यंदाचा दुसरा चित्रपट आहे. शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाचा रेकाॅर्ड गदर 2 तोडेल असे सांगितले जात आहे. पुढील काही दिवसांमध्ये गदर 2 धमाल करू शकतो.
गदर 2 चित्रपटात सनी देओल याच्यासोबत अमीषा पटेल मुख्य भूमिकेत आहे. चाहत्यांना पूर्वीप्रमाणेच सनी देओल आणि अमीषा पटेल यांची जोडी आवडलीये. गदर 2 हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच ठरलाय. या चित्रपटाने ओपनिंग डे पासूनच धमाका करण्यास सुरूवात केलीये. आता या चित्रपटाने 465 कोटींचे कलेक्शन हे केले आहे.
सनी देओल याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सनी देओल हा काही मोठे खुलासे करताना दिसला आहे. सनी देओल याला विचारण्यात आले की, बाॅलिवूडच्या कोणत्या अभिनेत्रीसोबत तुला काम करायला आवडेल. यावर उत्तर देताना सनी देओल हा म्हणाला की, मला आलिया भट्ट हिच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल.
यावर पुढे सनी देओल हा म्हणाला की, फक्त अभिनेता आणि अभिनेत्रीच म्हणून नाही तर मला तिच्यासोबत कोणतीही भूमिका करायला नक्कीच आवडेल. मुलगी आणि वडिलांची भूमिका आलिया भट्ट हिच्यासोबत करायला नक्कीच आवडेल. आलिया भट्ट ही एक जबरदस्त अभिनेत्री असल्याचे सांगताना देखील सनी देओल हा दिसला.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट हिला मोठा पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्ट हिचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत आणि विशेष म्हणजे ते चित्रपट धमाका देखील करत आहेत. आलिया भट्ट हिची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग देखील आहे. काही दिवसांपूर्वीच आलिया आणि रणवीर सिंह याचा चित्रपट रिलीज झालाय.
सनी देओल याने गदर 2 हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये सनी देओल हा आपल्या चाहत्यांना गदर 2 चित्रपट बघण्यासाठी आव्हान करत होता. इतकेच नाही तर काही चुकले तर माफ करा. मात्र, तुम्ही कोणीही भांडत बसू नका असेही सनी देओल हा त्या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.