Sunny Deol | सनी देओल याचा मोठा खुलासा, भारत न्यूझीलंड सामन्यामध्ये ‘या’ कारणामुळे केली मारहाण
सनी देओल हा गदर 2 चित्रपट रिलीज झाल्यापासून तूफान चर्चेत आहे. सनी देओल हा सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसतोय. सनी देओल याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुंबई : सनी देओल याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाने तगडी कमाई केलीये. गदर 2 चित्रपटाने जगभरातून तब्बल 685.7 कोटींचे कलेक्शन केले. गदर 2 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. गदर 2 चित्रपटाचे बजेट 60 कोटी होते आणि चित्रपटाने (Movie) 685.7 कोटींचे कलेक्शन केले. गदर 2 हा चित्रपट सक्सेस ठरलाय. गदर 2 हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे.
गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. सनी देओल आणि अमीषा पटेल या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले. गदर 2 हा चित्रपट तब्बल 22 वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला.पूर्वीप्रमाणेच प्रेम चित्रपटाला मिळाले.
गदर 2 चित्रपटाच्या यशानंतर आता सनी देओल याने आपल्या फिसमध्ये मोठी वाढ केलीये. इतकेच नाही तर सनी देओल याच्याकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर असल्याचे देखील सांगितले जातंय. गदर 2 च्या यशानंतर सनी देओल याने मुंबईमध्ये खास पार्टीचे आयोजन केले. या पार्टीला बाॅलिवूडचे अनेक कलाकार हे उपस्थित होते.
आता नुकताच सनी देओल याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठे खुलासे करताना सनी देओल हा दिसलाय. सनी देओल म्हणाला की, एककाळी मी आपल्या गाडीमध्ये चक्क तलवारी, लोखंडी रॉड आणि हॉकी स्टिक देखील ठेवत असे. इतकेच नाही तर हे भांडणे आपल्या वडिलांपासून लपवून ठेवण्यासाठी आईची मदत घेत.
सनी म्हणाला, मी खूप ठिकाणी भांडणे केली. एकदा तर थेट भारत-न्यूझीलंड सामन्यादरम्यान माझी भांडणे झाली. सामना बघण्यासाठी मी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो. त्यावेळी काही लोकांना समजले की, मी धर्मेंद्र यांचा मुलगा आहे. मग त्यांनी माझी रॅगिंग घेण्यास सुरूवात केली. माझ्यावर सिगारेट फेकण्यात आली. मला प्रचंड राग आला.
इतकेच नाही तर मग मी थेट या गोष्टींना कंटाळून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी मी काय करत होते हेच मला कळत नव्हते. मला स्वत:लाच कळत नव्हते की, मी इतके जास्त कोणाला मारत आहे. मी फक्त त्या लोकांना मारत होतो. सनी देओल हा पुढे म्हणाला की, नेहमीच भांडणे ही मला वडिलांपासून लपवून ठेवावी लागत असतं.