Sunny Deol | नेपोटिझमवर स्पष्ट बोलताना दिसला सनी देओल, थेट म्हणाला, बाप मुलासाठी नाही तर…
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 चित्रपटाने तगडी कमाई केली. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला. सनी देओल याने नुकताच मोठे विधान केले.
मुंबई : सनी देओल हा सध्या गदर 2 या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसला. गदर 2 चित्रपटाने कमाईमध्ये अनेक रेकाॅर्ड ब्रेक केले. इतकेच नाही तर यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट (Movie) ठरलाय. गदर 2 चित्रपटाची एक मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळाली. गदर 2 हा चित्रपट बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित नक्कीच ठरलाय. गदर 2 चित्रपटाचे प्रमोशन करताना सनी देओल हा दिसला.
सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला बाॅलिवूड स्टार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले. या पार्टीतील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. इतकेच नाही तर चक्क गदर 2 चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये शाहरूख खान हा देखील पोहचला.
गदर 2 चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. नुकताच आता सनी देओल याने नेपोटिझमवर मोठे भाष्य केले. सनी देओल थेट म्हणाला की, मला बरेच दिवस नेपोटिझमचा अर्थच मुळात माहिती नव्हता. पुढे सनी म्हणाला की, प्रत्येक बाप आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करतो आणि यामध्ये काही वाईट नाहीये असे मला वाटते.
जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही नाही करणार तर कोणासाठी करणार ना? पुढे सनी देओल म्हणाला, मला वाटते की, हे फक्त बाॅलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे. सनी देओल याचा मुलगा राजवीर देओल याचा काही दिवसांपूर्वीच दोनो हा चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील राजवीर देओल दिसला.
राजवीर देओल याने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एक मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. राजवीर देओल थेट म्हणाला की, मी अभिनयामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मला माझ्या घरूनच विरोध केला गेला. माझ्या पालकांना वाटत होते की, मी दुसरे कोणतेही क्षेत्र निवडायला हवे पण अभिनय अजिबातच नाही. शेवटी काय करणार ना? माझे प्रेम अभिनयावर झाले. आता सनी देओल याने केलेल्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय.