Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol | बंगल्याच्या लिलावाच्या नोटीसमधून मोठं सत्य समोर; काय आहे सनी रहस्य?

Sunny Deol | सनी देओल यांचं मोठं रहस्य अखेर समोर... बंगल्याच्या लिलावाच्या नोटीसमधून सत्य आलं समोर... सध्या सर्वत्र सनी देओल यांच्या खासगी आयुष्याची चर्चा..

Sunny Deol | बंगल्याच्या लिलावाच्या नोटीसमधून मोठं सत्य समोर; काय आहे सनी रहस्य?
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 8:43 AM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : अभिनेते सनी देओल सध्या ‘गदर २’ सिनेमाच्या यशाचा आनंद घेत आहेत. ‘गदर २’ सिनेमाने ११ दिवशी फक्त १४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाने आतापर्यंत ३८९.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सनी देओल फक्त त्यांच्या सिनेमामुळे नाही तर, गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहेत. अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांच्या मुंबईतील जुहू इथल्या बंगल्याच्या लिलाव लागणार होता. पण बँकेने नोटीस मागे घेतल्यामुळे सनी देओल यांना दिलासा मिळाला आहे.

येत्या २५ ऑगस्ट रोजी लिलावाची प्रक्रिया पार पडणार होती. ५६ कोटी रुपये वसूल करण्यासाठी सनी देओल यांचा बंगला बँक ऑफ बरोडाने ब्लॉकवर ठेवला होता. सनी देओल हे डिसेंबर २०२२ पासून बँक ऑफ बरोडाच्या ५५.९९ कोटी रुपयांच्या कर्जाचे थकबाकीदार आहेत. सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव लागला नाही. पण त्यांचं खरं नाव समोर आलं आहे.

सनी देओल या नावाने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या सनी देओल यांचं खरं नाव अजय सिंग देओल असं आहे. पण बँकेने बंगल्याच्या लिलावाची नोटीस मागे घेतल्यामुळे सनी देओल यांना दिलासा मिळाला आहे. ‘अजय सिंग देओल ऊर्फ सनी देओल यांच्या बंगल्याच्या विक्री संदर्भातील लिलावाची नोटीस काही तांत्रिक कारणांमुळे मागे घेण्यात आली आहे’, असं बँकेनं स्पष्ट केलं .

सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाची कमाई

‘गदर २’ सिनेमाने अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. तर ‘गदर २’ सिनेमा अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने ५४३.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाता सिक्वल ‘गदर २’ सिनेमा २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. यंदाच्या वर्षातील सर्वात जास्त करणाऱ्या सिनेमांपैकी ‘गदर २’ देखील एक सिनेमा आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगली आहे.

Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा
शेतकरी कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा.
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश
अक्षय शिंदे प्रकरणात अपडेट, पोलिसांवर गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश.