सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहीण श्वेताने शेअर केला इमोशनल व्हीडिओ, चाहते म्हणाले…

मुंबई: बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) याचा आज 36 वा वाढदिवस आहे. आज जरी तो या जगात नसला तरी त्याचे कुटुंबीय आणि त्याचे चाहते त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्याच्या आठवणी जागवत आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने  (shweta singh kirti) एक इमोशनल व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर […]

सुशांत सिंग राजपूतच्या वाढदिवसानिमित्त बहीण श्वेताने शेअर केला इमोशनल व्हीडिओ, चाहते म्हणाले...
सुशांत सिंग राजपूत, श्वेता सिंग किर्ती
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 1:13 PM

मुंबई: बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) याचा आज 36 वा वाढदिवस आहे. आज जरी तो या जगात नसला तरी त्याचे कुटुंबीय आणि त्याचे चाहते त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. त्याच्या आठवणी जागवत आहेत. सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने  (shweta singh kirti) एक इमोशनल व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर सुशांतचे चाहते भावूक झाल्याचं पहायला मिळतंय. ‘आजही तुझी आठवण येते. मिस यू सुशांत…’ अश्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

श्वेता सिंग किर्तीची इन्स्टाग्राम पोस्ट

सुशांतचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची बहिण श्वेता सिंग किर्तीने इन्स्टाग्रामवर एक इमोशनल व्हीडिओ शेअर केला आहे. ‘माय गॉड! हा किती सुंदर व्हीडिओ आहे. माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा… आम्ही तुझी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुझ्या स्वप्नांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. सुशांतच्या टीमने हा सुंदर व्हीडिओ बनवला, तुमचे खूप खूप आभार.’ असं श्वेताने या व्हीडिओसाठी कॅपशन लिहिलं आहे.

व्हीडिओवर सुशांतच्या चाहत्यांची प्रतिक्रिया

सुशांतसाठी बनवलेला हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते खूप भावूक होताना पहायला मिळत आहेत. ‘सुशांत, आजही तुझी आठवण येते. आज तु असतास तर आणखी दर्जेदार सिनेमे बॉलीवूडला मिळाले असते.’ अश्या भावूक कमेंट या व्हीडिओवर पहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सुशांत सिंग राजपूतने एम. एस. धोनी केदारनाथ, छिछोरे, शुद्ध देसी रोमान्स, राबता, पी.के, काय पो चे या सिनेमांमध्ये सुशांतने काम केलं. दिल बेचारा हा सुशांतचा शेवटचा सिनेमा ठरला.

सुशांत सिंग राजपूतचा 14 जून 2020 ला मृत्यू झाला. त्यावेळीही त्याचे चाहते भावूक झाले होते. आज त्याच्या वाढदिवशीही सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट पहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या

खुबसुरती का दूसरा नाम अनन्या पांडे, काल ‘गेहराईयाँ’चा ट्रेलर आऊट आज अनन्याचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर

gehraiyaan movie : दीपिका पादुकोणचा ‘तो’ बोल्ड अंदाज पती रणवीर सिंगलाही आवडला, ‘गेहराईयाँ’चा ट्रेलर पाहून म्हणाला…

अमोल कोल्हे यांच्या नथुरामला आमचा विरोध नाही, राष्ट्रवादीची सर्वात मोठी भूमिका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.