सुशांत सिंह राजपूतने मृत्यू आधी काय केलं? जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा
Sushant Singh Rajput Death: मृत्यूच्या आधी सुशांत सिंह राजपूत कोणत्या अवस्थेत होता, काय करत होता? अभिनेत्याच्या जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा..., अभिनेत्याच्या मृत्यूचं कारण अद्यापही एक रहस्य...
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर कुटुंबियांसोबतच सेलिब्रिटी आणि चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. सुशांतच्या निधनाला 4 वर्ष झाली आहेत. पण अभिनेत्याने करियरच्या उच्च शिखरावर असताना इतकं टोकाचं पाऊल का उचललं? आजही या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांनी आणि कुटुंबियांना मिळालेलं नाही. अभिनेत्याच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. आजही सुशांतच्या मृत्यू प्रकरणी चौकशी सुरु आहे.
सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अनेक सेलिब्रिटींची देखील चौकशी करण्यात आली होती. त्याच दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या माजी मॅनेजरने धक्कादायक खुलासा केला होता. ज्यादिवशी अभिनेत्याने स्वतःला संपवण्याचा विचार केला, त्यादिवशी सुशांतची अवस्था कशी होती. याबद्दल अभिनेत्याच्या माजी मॅनेजरने मोठा खुलासा केला आहे.
सुशांत सिंह राजपूत याचा माजी मॅनेजर अंकित आचार्य याने मोठा दावा केला होता. ‘सुशांत सकाळी 6 वाजता उठला होता. त्याने नाश्ता केला. ज्यूस प्यायला आणि त्यानंतर स्वतःला खोलीत बंद करुन घेतलं.’ रिपोर्टनुसार, सुशांत याने 14 जून 2020 मध्ये शेवटचा श्वास घेतला.
मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात सुशांत सिंह राजपूत याने स्वतःला संपवलं. स्वतःच्या खोलीत अभिनेता मृत अवस्थेत अढळला होता. मृत्यूनंतर याप्रकरणी वेग-वेगळ्या मार्गांना चौकशी सुरु होती. तेव्हा सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिच्या भावाला देखील तुरुंगाची हवा खावी लागली होती. आजही चाहते आणि कुटुंबिय अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.
सुशांत याच्या मृत्यूनंतर ड्रग्स प्रकरणी देखील अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली. एवढंच नाही तर, अनेकांना तुरुंगवास देखील भोगावा लागला. सुशांत हत्या प्रकरणी अभिनेत्री सारा अली खान हिची देखील चौकशी करण्यात आली होती. चौकशी दरम्यान, सारा हिने सुशांतसोबत प्रेमसंबंध असल्याचं मान्य केलं होतं.
चौकशीमध्ये साराने मोठा खुलासा केला होता. ‘आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो. पण नात्यात सुशांत निष्ठावंत नसल्यामुळे आमचं ब्रेकअप झालं…’ असं कबुली सारा अली खान हिने दिली होती. सारा आणि सुशांत यांनी ‘केदारनाथ’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमानंतर सुशांत – सारा यांच्या नात्याच्या चर्चा देखील सर्वत्र रंगू लागल्या. पण दोघांनी कधीच नात्याची कबुली दिली नाही. आजही सारा, सुशांत सोबत असलेल्या खास आठवणी शेअर करत असते.