‘परत जायचं आहे पण…’, अनेक वर्षांनंतर विकी कौशलची एक्स-गर्लफ्रेंड असं का म्हणाली?
Vicky Kaushal EX - Girlfriend : कोण होती विकी कौशल याची एक्स-गर्लफ्रेंड, अनेक वर्षांनंतर 'ती' असं का म्हणाली, 'परत जायचं आहे पण...', सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या एक्स-गर्लफ्रेंडची चर्चा... एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र होत्या दोघांच्या नात्याच्या चर्चा...
अभिनेता विकी कौशल आता अभिनेत्री आणि पत्नी कतरीना कैफ हिच्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. पण कतरिना हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी विकी याच्या आयुष्यात अभिनेत्री हरलीन सेठी होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. हरलीन अभिनेत्री असून सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पण ‘ब्रोकेन बट ब्यूटीफूल’ सीरिजमुळे हरलीन हिच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. सीरिजमध्ये हरलीन हिच्यासोबत अभिनेता विक्रांत मेसी होता. हरलीन – विक्रांत यांची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली होती.
आजही सीरीजमधील हरलीन – विक्रांत यांची व्यक्तिरेखा आणि त्यांची अप्रतिम केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. हरलीन सेठी आणि विक्रांत मॅसी ही जोडी पुन्हा पडद्यावर येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.
View this post on Instagram
नुकताच, एकता कपूर हिने ‘ब्रोकेन बट ब्यूटीफुल सीजन 5’ ची घोषणा केली. यावर हरलीन म्हणाली, ‘मला परत यायचं आहे. पण मला नाही वाटत असं काही होईल. ब्रोकेन बट ब्यूटीफुल सीरिजचा पुढचा प्रवास कसा असेल मला पाहायचं आहे. पण मला नाही वाटत असं काही होईल. पण काहीही होऊ शकतं…’ असं अभिनेत्री म्हणाली.
‘ब्रोकेन बट ब्यूटीफुल’ सीरिजचा 4 सीझन येणार नाही.
हरलीन – विक्रांत यांनी ‘ब्रोकेन बट ब्यूटीफुल’ सीरिजचे 2 सीझन केले. त्यानंतर अभिनेका सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठी यांनी तिसऱ्या सीझनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शनिवारी एकता कपूर हिने महत्त्वाची घोषणा केली. सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर सीरिजमधून त्याला कोणी रिप्लेस करणार नाही. थेट पाचवा सिझन चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.
हरलीन सेठी आणि विकी कौशल यांचं नातं
सांगायचं झालं तर, अभिनेत्री कतरिना कैफ हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी अभिनेता हरसीन हिला डेट करत होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सीरीज ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ सीरिजच्या पहिल्या सीरिजच्या स्क्रिनींग दरम्यान दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. ब्रेकअपनंतर विकी खासगी आयुष्या पुढे गेला आहे.