काय करतात सोनाक्षी सिन्हा हिचे भाऊ लव आणि कुश? एक भाऊ आहे विवाहित
Sonakshi Sinha Marriage | सोनाक्षी सिन्हा हिचे भाऊ लव आणि कुश कोणत्या क्षेत्रात करतात काम? अभिनेत्रीच्या लग्नावर भाऊ लव आणि कुश यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. पण सोनाक्षी हिच्या भावांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सिन्हा कुटुंब तुफान चर्चेत आहे. चाहते आणि सोशल मीडियावर फक्त आणि फक्त सिन्हा कुटुंबाची चर्चा रंगली आहे. सोनाक्षी हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. अभिनेत्रीच्या लग्नावर भाऊ लव आणि कुश यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. पण सोनाक्षी हिच्या भावांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तर आज सोनाक्षी सिन्हा हिच्या दोन भावांबद्दल आणि दोघे काय करतात याबद्दल जाणून घेऊ… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा हिच्या भावांची चर्चा रंगली आहे.
लव सिन्हा याचा जन्म 5 जून 1983 मध्ये झाला. सोनाक्षी हिचा मोठा भाऊ लव याने 2010 मध्ये ‘सदिया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2018 मध्ये ‘पलटन’ आणि 2023 मध्ये ‘गदर 2’ सिनेमातून लव चाहत्यांच्या भेटीस आला. पण वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रमाणे लव याला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करता आलं नाही. अखेल लव याने राजकारणात प्रवेश केला.
सोनाक्षी हिचा दुसरा भाऊ कुश याने देखील 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘लव्ह का द एन्ड’ असं कुश याच्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं. ‘दबंग’ सिनेमात कुश याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेशरम’ सिनेमात देखील कुश याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलं आहे.
कुश याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्याने 2015 मध्ये गर्लफ्रेंड तरुणा सिन्हा हिच्यासोबत लग्न केलं. सोशल मीडियावर सोनाक्षी हिचे कुटुंबियांसोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण अभिनेत्रीच्या लग्नात दोन्ही भाऊ नसल्याची माहिती मिळत आहे.
सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाबद्दल भाऊ कुश म्हणाला, मी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि मला जास्त लाईमलाईटमध्ये राहायाला आवडत नाही. मी सोनाक्षीच्या लग्नात होतो. कुटुंबासाठी तो खूप भावनिक काळ होता. मी माझ्या बहिणीला तिच्या लग्नाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो… असं अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला होता.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न…
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी 23 जून 2024 मध्ये लग्न केलं. जवळपास 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी सिन्हा – झहीर इक्बाल यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.