Adah Sharma: अदा शर्माचं शिक्षण इतकं कमी, पण कमवते पाण्यासारखा पैसा
Adah Sharma: शिक्षण इतकं कमी असूनही अदा शर्मा कमवते कोट्यवधींची माया... अभिनेत्रीकडे इतक्या कोटी रुपयांची संपत्ती, अदा शर्मा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चा...
Adah Sharma: अभिनेत्री अदा शर्मा हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. पण ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. अदा शर्मा फक्त तिच्या सिनेमांमुळे नाही तर, अनेक कारणांमुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या घरात शिफ्ट झालेली अदा आता तिच्या शिक्षणामुळे चर्चेत आली आहे. अदा शर्मा हिने उच्च शिक्षण घेतलेलं नाही. पण अभिनेत्री आजच्या घडीला बक्कळ पैसा कमवते.
अदा शर्मा हिचा जन्म मुंबईत झाला आणि अभिनेत्री सुरुवातीचं शिक्षण देखील मुंबईत घेतंल आहे. लहान असतानात अभिनेत्री होण्याचं स्वप्न अदा शर्मा हिने पाहिलं होतं. अभिनेत्री व्हायचं असल्यामुळे अदा हिने शिक्षणात देखील अधिक रस घेतला नाही. अदा शर्मा हिच्या आई – वडिलांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनेत्री होण्याचा सल्ला अदा हिला दिला.
अदा हिने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर अभिनेत्रीने उच्च शिक्षणासाठी नकार दिला. अदा हिने फक्त 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अदाने अभिनय विश्वात पदार्पण केलं. अभिनयासोबत अदा नृत्याचे देखील धडे गिरवत होता.
अदा शर्मा हिने कथक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. कथक शिवाय अभिनेत्रीला अनेक प्रकारचे डान्स येतात. अदा शर्मा हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने दिग्दर्शक विक्रम भट्ट दिग्दर्शित 1920 सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्या सिनेमात दमदार कामगिरी केल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
अदा शर्मा हिच्या संपत्तीबद्दल सांगाचयं झालं तर, अभिनेत्रीकडे 10 ते 12 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सिनेमे, जाहिराती आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री गडगंज पैसे कमवते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अदा शर्मा हिची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अदा कायम सक्रिय असते.
अदा शर्मा हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘तुमको मेरी कसम’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमातून इंदिरा आयव्हीएफचे संस्थापक डॉ अजय मुर्डिया यांचं संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सिनमात अदा शर्मा हिच्यासोबत इश्वाक सिंह आणि अभिनेते अनुपम खेर देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.