‘The Kerala Story सिनेमातील बलात्काराचे सीन पाहून माझी आजी…’, अदा शर्माच्या ‘या’ वक्तव्याने व्हाल हैराण

'द केरळ स्टोरी' मध्ये बलात्काराच्या सीनमुळे आजीला सिनेमा दाखण्यासाठी घाबरत होती अदा शर्मा, सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेत्रीच्या आजीने दिलेली प्रतिक्रिया म्हणजे...

'The Kerala Story सिनेमातील बलात्काराचे सीन पाहून माझी आजी...', अदा शर्माच्या 'या' वक्तव्याने व्हाल हैराण
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 4:14 PM

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा सध्या ‘द केरळ स्टोरी’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमातील अभिनेत्रीच्या भूमिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली अदा तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत आहे. ‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात गर्दी केली. असंख्य चाहत्यांनी अदा हिला ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर पाहिलं. पण अदा हिला आजीसोबत सिनेमा पाहण्यासाठी भीती वाटत होती. सिनेमात मारहाण आणि बलात्काराचे सीन असल्यामुळे अदा सिनेमा पाहताना आजीसमोर घाबरली होती. ही गोष्ट खुद्द अदाने एका मुलाखती दरम्यान सांगितली. सध्या अदा शर्मा हिची चर्चा तुफान रंगत आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली, ‘सिनेमाच्या कथेबद्दल आजी आणि आईला सर्वकाही माहिती हेतं. पण सिनेमात बलात्काकाचे सीन असल्यामुळे आजी काय म्हणेल याची चिंता मला सतावत होती.’ सिनेमा पाहिल्यानंतर दादी म्हणाली, ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला A नाही तर UA प्रमाणपत्र मिळावं. तरुणींनीही हा सिनेमा पाहावा. असं देखील अभिनेत्रीच्या आजी म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

‘सिनेमा पाहिल्यानंतर आई आणि आजी यांची काय प्रतिक्रिया असेल याची मला कल्पना नव्हती.. पण दोघींनी सिनेमा आवडला…’ असं देखील अभिनेत्री अदा शर्मा म्हणाली. अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द करेळ स्टोरी’ सिनेमाने सर्वांच्या मनात घर केलं आहे. अनेकांनी सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर गर्दी केली…

सिनेमाने पहिल्या आठवड्यात १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा केलीा आहे. पण आता सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या आठवड्यात गुरुवारी सिनेमाने फक्त ७ कोटी रुपयांच्या गल्ला जमा केला आहे. सिनेमाने आतापर्यंत १७१.७२ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे.

सिनेमातील अदा शर्मा हिची भूमिका

‘द केरळ स्टोरी’ सिनेमात अदा शर्माने शालिनी उन्नीकृष्णन आणि फातिमा यांची भूमिका साकारली आहे. सिनेमात अदा लव्ह जिहादच्या प्रकरणात अडकते आणि नंतर तिचं धर्मांतर होतं. धर्मांतरानंतर ISIS चे लोक तिच्यावर बलात्कार करतात. ती ज्याच्याशी लग्न करते, तोही तिच्यावर जबरदस्ती करतो. धर्मांतरन केल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक संकटं येतात.

पण ISIS च्या लोकांच्या तवडीतून अदा पळ काढते. सिनेमात अदा शर्मा हिने शालिनी आणि फातिमा या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सध्या सर्वत्र अदा शर्मा आणि ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.