Adah Sharma | फक्त ‘या’ गोष्टीमुळे अदा शर्मा हिच्या हातून गेले अनेक चित्रपट, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

बाॅलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. अदा शर्मा ही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती. द केरळ स्टोरी चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत असून अदा हिचा अभिनय प्रेक्षकांना जबरदस्त आवडल्याचे दिसत आहे.

Adah Sharma | फक्त 'या' गोष्टीमुळे अदा शर्मा हिच्या हातून गेले अनेक चित्रपट, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 4:27 PM

मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध हा केला गेला. द केरळ स्टोरी (The Kerala Story) चित्रपटावर सातत्याने बंदी घालण्याची मागणी ही केली जात होती. अनेकांनी चित्रपटाच्या विरोधात थेट कोर्टात धाव देखील घेतली. मोठ्या वादानंतर अखेर द केरळ स्टोरी हा चित्रपट (Movie) 5 मे रोजी रिलीज झाला. कोणीही विचार केला नसेल की, द केरळ स्टोरी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर 250 कोटींची कमाई करेल. कारण चित्रपटाचे टिझर (Teaser) रिलीज झाले आणि सतत चित्रपटाला विरोध केला गेला. मात्र, सर्वांनाच मोठा धक्का देत चित्रपटाने तूफान अशी कामगिरी नक्कीच केलीये.

द केरळ स्टोरी चित्रपटामध्ये अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत आहे. अदा शर्मा हिच्या अभिनयाचे काैतुक देखील केले जात आहे. द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज झाल्यापासून अदा शर्मा ही प्रचंड चर्चेत आहे. अदा शर्मा ही चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली होती.

चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रवास हा अदा शर्मा हिचा नक्कीच सोपा नव्हता. अदा शर्मा हिने नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काही धक्कादायक खुलासे हे केले आहेत. अदा शर्मा म्हणाली की, मला अनेकांनी नाकाची शस्त्रक्रिया करणाराचा सल्ला दिला होता. अनेकांनी थेट तोंडावर म्हटले होते की, तुझे नाक अजिबातच चांगले नाहीये.

अगोदर जाऊन तू नाकाची शस्त्रक्रिया करून ये, मग कदाचित तुला काम मिळू शकते. आपल्या नाकामुळे आपल्याला अनेक चित्रपट मिळाले नसल्याचे देखील अदा शर्मा म्हणाली. पण आता लोकांना माझे नाक देखील चांगले वाटत असल्याचे देखील अदा हिने म्हटले. चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर अदा शर्मा खुश आहे. विशेष म्हणजे अजूनही चांगली कमाई करताना द केरळ स्टोरी हा चित्रपट दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच अदा शर्मा हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. हे फोटो द केरळ स्टोरी चित्रपटाच्या शूटिंगच्या ठिकाणचे होते. या फोटोमध्ये अदा शर्मा हिच्या चेहऱ्यावर मोठी दुखापत दिसल होती. विशेष म्हणजे यावेळी अदा शर्मा हिने 48 तास पाणी देखील पिले नव्हते. या फोटोवरून कळते की, अदा शर्मा हिने चित्रपटासाठी किती जास्त मेहतन घेतलीये.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.