Love Life | सुंदर होती, गडगंज पैसाही होता, असं असताना ‘या’ अभिनेत्याने का सोडली शाही घराण्याच्या लेकीची साथ?

Love Life | वयाच्या २१ वर्षी शाही घराण्याच्या लेकी 'या' अभिनेत्यासोबत लग्न तर केलं पण त्याने नाही दिली शेवटपर्यंत साथ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या खासगी आयुष्याची चर्चा... का घेतला दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय...

Love Life | सुंदर होती, गडगंज पैसाही होता, असं असताना 'या' अभिनेत्याने का सोडली शाही घराण्याच्या लेकीची साथ?
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 7:38 PM

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वात कधी कोणाचं ब्रेकअप आणि घटस्फोट होणार सांगता येत आहे. नात्याच्या सुरुवातीला सेलिब्रिटी चाहत्यांना कपल गोल्स देतात. पण काही वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असंच काही अभिनेत्री आणि शाही घराण्याची लेक अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्यासोबत झालं आहे. ‘दिल्ली 6 (Delhi-6) फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. पण अभिनेत्रीला स्वतःची ओळख निर्माण करता आली नाही. सध्या सर्वत्र अदिती हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. अदिती हिने खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना करावा लागला…

अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या २१ व्या वर्षी अभिनेता सत्यदीप मिश्रा याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं जास्त काळू टिकू शकलं नाही. दोघांच्या घटस्फोटनंतर अनेक चर्चा रंगल्या..

सतत वाद होत असल्यामुळे दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अभिनेता सत्यदीप मिश्रा याने फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यासोबत लग्न केलं आहे.

हे सुद्धा वाचा

सत्यदीप आणि अदिती यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सत्यदीप आणि अदिती दोघे एकमेकांना १७ वर्षांपासून ओळखत होते. कालांतरीने त्यांच्या ओळखीचं मैत्रीत रुपांतर झालं. त्यानंतर मैत्रीचं प्रेमात… नातं अधिक घट्ट झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला.

लग्नानंतर काही काळ अदिती आणि सत्यदीप यांनी सुखी संसार केला, पण लग्नानंतर मात्र दोघांमध्ये खटके उडू लागले. म्हणून लग्नाच्या दोन वर्षांनंतर सत्यदीप आणि अदिती यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये सत्यदीप आणि अदिती यांचा घटस्फोट झाला.

अदिती राव हैदरी हिच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री राजघराण्यातील आहे. अकबर हैदरी यांची नात असण्यासोबतच ती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. आदितीचे आई हिंदू आणि वडील मुस्लिम आहेत. अदिती तिच्या आडनावात आई आणि वडील दोघांची नावे लिहिते.

अदिति राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, तिने ‘रॉकस्टार (Rockstar)’, ‘दास देव (Daas Dev)’ आणि ‘पद्मावत (Padmaavat) यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री सोशलम मीडियावर देखील कायम सक्रिय असते. चाहते कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षीत आसतात.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.